old trunk in house, Canada soldiers: सध्याचे युग हे ऑनलाइन आणि इंटरनेटचे आहे. आपल्याला काहीही हवे असेल तर आपण ऑनलाइन मागवू शकतो किंवा काहीही शोधू शकतो. इतकेच नव्हे तर आपली महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन सेव्ह करून ठेवू शकतो. पण पूर्वीच्या काळी लोक आपल्या वस्तू किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी, कागदपत्रे एखाद्या बॅगेत किंवा ट्रंकेत ठेवत असत. पत्र्याच्या ट्रंका आतील ऐवज खराब होऊ देत नसल्याने सहसा त्या ट्रंका वापरल्या जात. पण बरेचदा ज्या व्यक्तीने ती ट्रंक वापरलेली असते, तो त्यातील ऐवज काय आहे ते इतरांना कळू देत नाही. मग त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पश्चात ट्रंक उघडली की त्यातील गोष्टींचा अंदाज येतो. पण असेच करताना एका मुलीला आपल्या वडिलांच्या ट्रंकेत जे सापडले त्यामुळे एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हेतर तिला या गोष्टीमुळे थेट कॅनडाच्या सेनेला बोलवावे लागले.
नक्की काय घडला प्रकार?
ही घटना कॅनडातील एका शहरात घडली. क्यूबेक शहरात राहणारी महिला केड्रिन सिम्स ब्राचमेन हिच्या वडीलांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. जेव्हा त्यांचे निधन झाले त्यानंतर बरेच दिवसांनी महिलेने, म्हणजेच त्यांच्या मुलीने, त्यांची ट्रंक उघडण्याचा निर्णय घेतला. मुलीने जेव्हा ट्रंक तेव्हा तिला अपेक्षा होती की त्यात वडिल्यांच्या काही आठवणी असतील किंवा जुन्या गोष्टी असतील. पण ट्रंक उघडताच तिलाही धक्काच बसला. त्या ट्रंकेत चक्क एक जिवंत ग्रेनेड बॉम्ब होता.
सेनेच्या जवानांनी काय केले?
ट्रंकमध्ये जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर केड्रिन हिने सावधानता बाळगून लगेचच स्थानिक पोलिसांना फोन केला आणि बोलावून घेतले. स्थानिक पोलिसांनी घडलेला प्रकार पाहून कॅनडाच्या सेनेच्या जवानांना पाचारण केले. सेनेचे जवान घरी आले आणि त्यांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तेदेखील हैराण झाले. कित्येक वर्षांपूर्वी तो ग्रेनेड बॉम्ब ट्रंकमध्ये ठेवण्यात आला होता, पण तरीही तो बॉम्ब जिवंत होता आणि त्याची पिन काढली असती तर त्याचा स्फोटदेखील होऊ शकला असता. त्यामुळे सेनेच्या जवानांनी तो ग्रेनेड ताब्यात घेतला आणि आपल्यासोबत घेऊन गेले.
ट्रंकमध्ये बॉम्ब कुठून आला?
केड्रिनने सांगितले की ३० वर्षांपूर्वी तिचे वडील फ्रँक यांनी आजोबांच्या घरून हा जिवंत ग्रेनेड बॉम्ब आणला होता. घरातील सर्व मंडळींनी सांगितले होते की ग्रेनेड बॉम्ब घरात ठेवू नका, टाकून द्या. ही चर्चा झाल्यानंतर तो बॉम्ब आम्हाला कधीच दिसला नाही, त्यामुळे आम्हाला वाटले की त्यांनी आमचं ऐकलं. पण आज हा बॉम्ब सापडल्याने धक्काच बसल्याचे केड्रिनने स्पष्ट केले.