BMW कार घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकजण ही कार घेऊन खूप जपतात. पण या कारने तुम्ही कधी कुणाला कचरा उचलताना पाहिलं का? नाही ना? पण अशी एक घटना समोर आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये एका व्यक्तीला त्याच्या लक्झरी BMW कारने कचरा वाहून नेताना बघण्यात आलंय. ज्याने कुणी हा नजारा पाहिला ते बघतच राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BMW ने कचरा उचलणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे प्रिन्स श्रीवास्तव.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, व्यवसायाने व्यापारी असलेल्या प्रिन्सने त्याच्या वडिलांना गिफ्ट देण्यासाठी BMW ही कार विकत घेतली होती. त्याने मोठ्या प्रेमाने ही कार वडिलांना गिफ्ट केली. पण ही कार त्याच्यासाठी समस्येचं कारण बनली. केवळ दीड वर्षात या कारमध्ये समस्या येऊ लागल्या होत्या.
कथितपणे समस्या सोडवण्यासाठी कार सर्व्हिस सेंटरला नेण्यात आली. तेव्हा त्यांना त्रास देण्यात आला. पार्ट्स बदलण्याच्या नावावर पैसे वसूलण्यात आलेत. पण तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. कारमधील समस्या दूर झाली नाही. त्यामुळे अखेर वैतागून प्रिन्सने ९० लाख रूपयांची BMW कारने कचरा उचलणे सुरू केले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला.
असेही सांगितले जात आहे की, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सर्व्हिस सेंटरचे लोक प्रिन्सला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रिन्स त्यांचं काही ऐकायला अजिबात तयार नाही. सर्व्हिसिंग सेंटरच्या विरोधात त्याने आपल्या BMW कारने कचरा उचलण्याचं काम सुरू ठेवलं आहे.