शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

चोरलेल्या गाडीच्या मागच्या सीटवर दिसला चिमुरडा; यू-टर्न घेऊन चोरटा मुलाच्या आईवर ओरडला

By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 6:08 PM

चिमुरड्याला गाडीत एकटं कसं ठेवता? आईला लेक्चर देत चोरटा गाडी घेऊन फरार

ओरेगॉन: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका चोरट्यानं कार चोरल्यानंतर त्यात लहान मूल असल्याचं लक्षात येताच थेट यू-टर्न घेतला. गाडी जिथून चोरली, तिथे येत त्यानं मुलाच्या आईची खरडपट्टी काढली. मुलाला तिच्याकडे सोपवलं आणि पुन्हा गाडी घेऊन फरार झाला. या अजब घटनेची सध्या ओरेगॉनमध्ये चर्चा आहे. चोरट्यानं चोरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र चोरटा अद्याप तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपतीओरेगॉनमध्ये असलेल्या बेवेरटॉनमध्ये एका चोरट्यानं मांस विक्री करणाऱ्या दुकानाबाहेरून कार पळवली. कारच्या मागील सीटवर एक ४ वर्षांचं मूल असल्याचं काही अंतर पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं यू-टर्न घेतला. गाडी पुन्हा दुकानाजवळ आणली. लहान मुलाला गाडीत एकटं कसं सोडता? तुम्हाला मुलाची काळजी आहे की नाही?, अशा शब्दांत त्यानं चिमुरड्याच्या आईला लेक्चर दिलं. त्यानंतर आईनं कारमधून चिमुरड्याला बाहेर काढलं. यानंतर चोरटा गाडी घेऊन फरार झाला.क्या बात! आता बुटांनीही दुश्मनांवर गोळ्या झाडू शकतील जवान, तयार झाला सर्वात हायटेक Footwearबेवेरटॉन पोलिसांचे प्रवक्ते मॅट्ट हेंडरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक महिला अवघ्या मिनिटभरासाठी दुकानात गेली होती. तिची कार सुरूच होती. ही संधी साधून चोरट्यानं गाडी पळवली. मात्र थोड्याच वेळात तो कार घेऊन माघारी आला. लहान मुलाला कारमध्ये एकटं सोडून गेल्याबद्दल तो आईला ओरडला. मुलाला कारमधून बाहेर काढा, असं त्यानं आईला सांगितलं. आईनं मुलाला कारबाहेर काढताच चोरटा पुन्हा कार घेऊन पळाला.पोलिसांनी पोर्टलँडपासून १० मैलावर चोरलेली गाडी ताब्यात घेतली. पण अद्याप चोरट्याला अटक करण्यात यश आलेलं नाही. कार मालक महिलेनं चोरट्याला पाहिलं आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. मांस विक्री करणाऱ्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यामुळे चोरट्याला शोधण्यात अडचणी येत आहेत. चोरानं कारमधील ४ वर्षांच्या मुलाला कोणतीही इजा पोहोचवलेली नाही.