Caribbean Island For Sale: वेगवेगळ्या आयलॅंडबाबत जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा अनेकांना वाटत असतं की, तिथे राहण्याचा खर्च खूप जास्त राहत असेल. अनेकजण असाही विचार करतात की, केवळ श्रीमंत लोकच तिथे जाऊ शकतात. पण प्रत्येकवेळी असं नसतं. सध्या सोशल मीडियावर एका आयलॅंडची खूप चर्चा होत आहे. हे आयलॅंड विक्री आहे.
या आयलॅंडचं नाव इगुआना आहे आणि हे कॅरेबियन देश बहमासमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बेट विकण्यासाठी काढलं आहे. हे बेट निळ्याशार पाण्याने वेढलेलं आणि याच्या पाच एकर जमिनीवर एका घरासोबतच बऱ्याच गोष्टी आहेत. हिरवीगार झाडी आणि लक्झरी सुविधाही आहेत.
किती आहे याची किंमत?
या बेटावरील घरात तीन बेडरूम आणि दोन बाथरूम आहे. सोबतच एक किचन, लिविंग रूम, डायनिंग रूम आणि बारही आहे. एक रॅपराऊंड पोर्च सोबतच वायफाय, फोन आणि टीव्ही सिग्नलही आहे. रिपोर्ट्सनुसार, याची किंमत साधारण 5 लाख डॉलरच्या आसपास ठेवली आहे. म्हणजे भारतीय करन्सीनुसार पाच कोटी रूपयांपेक्षा कमी. या किंमत लंडन किंवा न्यूयॉर्क सारख्या शहरात एक सरासरी घर मिळतं.
आता प्रश्न असा येतो की, हे बेट इतक्या कमी किंमतीत का विकलं जात आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयलॅंड विकण्याचे अनेक नियम असतात. कमी किंमत असूनही याला कुणीही खरेदी करू शकत नाही. एक तथ्य हेही आहे की, हे खरेदी केल्यावर याची काही गॅंरंटी दिली जात नाही. पण हे बेट जगापासून फार दूर नाही. तिथे वायफाय, फोनसारख्या सुविधाही आहे.