शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकींचा जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
3
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
4
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
5
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
6
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
7
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
8
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
9
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
10
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
11
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
12
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
13
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
14
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
15
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
16
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
17
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
18
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
19
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ

कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 7:44 PM

अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

तुम्ही आतापर्यंत किती तरी हुशार असे पाळीव प्राणी (Clever Pets) पाहिले असतील. काही आपल्या मालकाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतात, तर काही प्राणी स्वतःच कित्येक गोष्टी करू शकतात. बोलणारे पोपट तर तुम्ही कित्येक व्हिडिओजमध्ये किंवा प्रत्यक्षातही पाहिले असतील; मात्र तुम्ही कधी ग्रॅज्युएट मांजर (Graduate Cat) पाहिलं आहे का? अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये (University of Texas) शिक्षण घेत असलेल्या फ्रांसिस्का बॉर्डिअर (Francesca Bourdier) या विद्यार्थिनीचं हे मांजर आहे. हे मांजर नेहमीच फ्रान्सिस्कासोबत असतं. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे जगभरातल्या जवळपास सर्वच विद्यापीठांनी ऑनलाइन लेक्चर्सचा पर्याय स्वीकारला होता. या काळात फ्रांसिस्कादेखील आपल्या लॅपटॉपच्या साह्याने ऑनलाइन लेक्चर्सना उपस्थित राहत होती. या लेक्चर्सदरम्यान सूकीदेखील पूर्ण वेळ फ्रांसिस्कासोबतच असायची. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणेच सूकीदेखील पूर्ण वेळ लेक्चरला (Cat attended online lectures) बसून असायची. 'फॉक्स न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पदवीदान समारंभाला मांजराची उपस्थितीफ्रांसिस्काने सांगितले, की सूकी तिच्यासोबत प्रत्येक लेक्चरला उपस्थित असायची. लेक्चरसाठी लॅपटॉप उघडताच ती घरात कुठेही असली, तरी येऊन लॅपटॉपसमोर बसायची. एखादी विद्यार्थिनी असल्याप्रमाणे ती संपूर्ण लेक्चर मन (Pet Cat attends online lectures with owner) लावून ऐकायची. त्यामुळेच पदवीदान समारंभालादेखील फ्रान्सिस्का आपल्या मांजराला घेऊन गेली.

ग्रॅज्युएशन ड्रेसमधले फोटोज व्हायरलपदवीदान समारंभाला जाण्यासाठी फ्रान्सिस्काने स्वतःसोबतच आपल्या मांजरासाठीही एक ग्रॅज्युएशन ड्रेस (Pet Cat wearing graduation dress) शिवला होता. सूकीचा ग्रॅज्युएशन ड्रेसही इतर विद्यार्थ्यांच्या ड्रेसप्रमाणेच होता. ग्रॅज्युएशन गाउन आणि कॅपमधले फ्रान्सिस्का आणि सूकीचे फोटो (Cat and owner Graduate from university) सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खरोखर डिग्री मिळालेली नाहीअर्थात, विद्यापीठाने खरोखरच सूकीला कोणतीही डिग्री दिली नाहीये; मात्र पदवीदान समारंभात ग्रॅज्युएशन ड्रेसमध्ये स्टेजवर जाण्याची संधी मात्र सूकीला नक्कीच मिळाली. त्यामुळेच नेटकरी आता सूकीला ‘ग्रॅज्युएट मांजर’ (Graduate Cat viral images) म्हणत आहेत. ज्या पद्धतीने तिने सर्व लेक्चरना उपस्थिती लावली, तेच पुरेसं असल्याचं अनेक सोशल मीडिया युझर्सनी म्हटलं आहे. सूकीची ही स्टोरी आणि फ्रान्सिस्कासोबतचे तिचे ग्रॅज्युएशन कॅप घातलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सर्वांनाच या पदवीधर मांजराची स्टोरी खूप आवडत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके