अरेरे! मांजरीसह खेळणं चिमुरडीला चांगलंच भारी पडलं; खेळण्याच्या नादात गमवावी लागली दृष्टी
By manali.bagul | Published: January 29, 2021 01:07 PM2021-01-29T13:07:38+5:302021-01-29T13:20:04+5:30
समोर आलेल्या माहितीनुसार मांजरींच्या मलाद्वारे हा आजार पसरतो. ज्यामुळे डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम होतो.
मांजरींसह खेळणं एका आठ वर्षांच्या मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. या कारणामुळेच टाक्सो पॅराकेनिस या आजाराचा सामना करावा लागल्यानं तिला आपले दोन्ही डोळे गमवावे लागले आहेत. डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार देशात या आजाराची तिसरी रुग्ण आढळून आली आहे. ही केस स्टडी अमेरिकन जर्नलकडे पाठवण्यात आली आहे. या मुलीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळूहळू या मुलीच्या डोळ्यांमध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मांजरींच्या मलाद्वारे हा आजार पसरतो. ज्यामुळे डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम होतो.
मध्यप्रदेशातील कानपूरमध्ये घंटाघर परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबानं तीन मांजरी पाळल्या होत्या. या कुटुंबातील चिमुरडी दोन तीन वर्षाची असल्यापासून मांजरींसह खेळत होती. साधारणपणे तिला जून महिन्यापासून असा त्रास व्हायला सुरूवात झाली. सुरूवातीला धुसर दिसायला लागले त्यानंतर दोन्ही डोळे लाल होऊ लागले.डॉक्टरांना सुरूवातीला वाटलं की हे साधे इन्फेक्शन असावे. औषध घेऊनही कोणताही परिणाम दिसून आला नाही.
त्यानंतर या मुलीला दिल्लीतील नेत्र रोग विभागात पोहोचवून विभागाध्यक्ष परवेज खान यांच्याकडून चाचणी करण्यात आली. या मुलीच्या जीवनशैलीबाबत माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर तिला मांजरीसह खेळण्याची सवय असल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान दिसून आलं की तिला टीनिया केंडीस परजीवीचे संक्रमण झाले आहे. ज्यामुळे या मुलीच्या डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम दिसून आला आहे. हे परजीवी संक्रमण मांजरींच्या मलाद्वारे डोळ्यात पोहोचते. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ
ऑप्टिकल कोहरेंस टोमोग्राफीमध्ये डोळे खराब झाल्याचे दिसून आले. काही स्टेरॉईड आणि एंटीपॅरासाईड औषधांनी या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सहा महिने सतत उपचार केल्यानंतर या मुलीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. भारतात टाक्सो पॅराकेनिस आजाराचा तिसरा प्रकार दिसून आला आहे. घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....