शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

काय सांगता? चक्क एका मांजरीला बनवलं 'या' शहराची महापौर; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 2:28 PM

एका मांजराला एका शहराचं महापौर बनवण्यात आलं आहे. महापौर बनलेली ही मांजर सध्या चर्चेत आली आहे.

महापौर हा शहराचा प्रमुख असतो. त्यामुळे त्याची भुमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. मोठ्या शहराचा कारभार त्याच्या हातात असतो. अशा या महत्त्वाच्या महापौरपदाच्या खुर्चीवर तुम्हाला जर कोणी मांजर असल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मांजराला एका शहराचं महापौर बनवण्यात आलं आहे. महापौर बनलेली ही मांजर सध्या चर्चेत आली आहे. 

अमेरिकच्या मिशिगन शहरात मांजराला महापौर करण्यात आलं आहे. जिंक्स असं या मांजरीचं नाव आहे. 24 एप्रिलला तिला महापौरपद देण्यात आलं. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मांजरीला महापौर बनवण्यात आलं असावं. याआधी मोठ्या डोळ्यांमुळे ही मांजर चर्चेत आली होती पण आता महापौर बनल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे. जिंक्सची मालकीण मियाने सांगितलं की, जिंक्स महापौरपदासाठी सर्वात योग्य होती. टिकटॉकवर तिचे जवळपास 7 लाख 35 हजार तर इन्स्टाग्रामवर 4 लाख फॉलोअर्स आहेत.  मियाला तीन वर्षांपूर्वी जिंक्स तिच्या घराबाहेर भेटली. मियाने सांगितलं जेव्हा जिंक्सला ती भेटली तेव्हा ती फक्त तीन आठवड्यांची होती. त्यानंतर ती तिला घेऊन कॅलिफॉर्नियाला आली. तिथे जिंक्सचे डोळे आणि तिचे पाय थोडे वेगळं असल्याचं दिसलं. इतर मांजरांपेक्षा ते खूपच मोठे होते. मियाने तिला डॉक्टरांनीही दाखवलं. डॉक्टरांनी तिला कोणताही आजार नसून हा जन्मदोष असल्याचं सांगितलं.

मियाने जिंक्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जे खूप व्हायरल झाले. काही कालावधीपूर्वीच तिने मजेत एक ट्विटर पोस्ट केली होती. ज्यात तिने आपण अनेक प्राण्यांना महापौर बनताना पाहिलं आहे, आपल्या मांजराला राष्ट्रपती बनवणार असल्याचं म्हटलं. हे ट्विटरकुणीतरी मिशगनलाही टॅग केलं आणि पाहता पाहता जिंक्सची महापौरपदासाठी निवड झाली. तिला एका दिवसासाठी महापौर बनवण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Americaअमेरिका