देशात आणि जगभरातच पाळीव प्राणी पाळण्याचा नाद असलेले लोक आपल्याकडे विविध जातीचे प्राणी ठेवत असतात. मग तो कुत्ता असो, मांजर असो वा इतर कुठला प्राणी. यातच बेंगलोरची एक व्यक्ती सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या व्यक्तीने गेल्या काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून एक खास कुत्रा विकत घेतला आहे. या कुत्र्याची लाइफस्टाईल एवढी लक्झरिअस आहे, की त्याच्यावर खर्च होणाऱ्या रोजच्या पैशांतून एखाद्याची सॅलरी होईल.
कुत्र्याचे नाव कॅडबॉम हैदर -बेंगलोरमध्येराहण्याऱ्या या व्यक्तीचे नाव सतीश असे आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सतीश यांच्या या कुत्र्याचे नाव कॅडबॉम हैदर, असे आहे. हा कुत्रा दीड वर्षांचा आहे. सतीश एक डॉग ब्रिडर आहे आणि बेंगलोरमध्ये त्यांचे कुत्र्यांना राहण्यासाठी घरही आहे. त्यांनी हैदराबादच्या एका ब्रीडरकडून कोकेशियन ब्रीडचा हा रेअर जातीचा कुत्रा खरेदी केला होता.
मिळाली होती 20 कोटींची ऑफर -या कुत्र्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या कुत्र्याने अनेक डॉग शोमध्येही भाग घेतला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत त्याने अनेक पदकेही मिळवली आहेत. नुकतेच हैदराबादमधील एका व्यावसायिकाने हा कुत्रा विकत घेण्यासाठी सतीशला 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र सतीश यांनी यासाठी नकार दिला होता.
रोजाचा खर्च दोन ते तीन हजार रुपये -आणखी एका वृत्तानुसार, या कुत्र्यावर सतीश रज दोन ते तीन हजार रुपये एवढा खर्च करतात. या कुत्र्याला फिरण्यासाठीही एसी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. हा देशातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे, हा अत्यंत फ्रेंडली कुत्रा आहे आणि घरातही आरामात राहतो. कोकेशियन ब्रीडचा हा कुत्रा अत्यंत बुद्धिमान असतो.