शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

12 किलोचं सोन्याचं एक नाणं, 40 वर्षांनी पुन्हा एकदा भारत सरकारने सुरू केला याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:29 PM

12Kg Gold Coin : हे नाणं शेवटचं हैद्राबादमधील शाही परिवाराचे टायटलर निजाम VIII मुकर्रम जाहकडे बघण्यात आलं होतं. त्याने हे नाणं स्विस बॅंकेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता.

12Kg Gold Coin :10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅमची सोन्याची नाणी तुम्ही पाहिली असतीलच. पण जगात सोन्याचं एक इतकं जास्त वजनी नाणं आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जगातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या नाण्याचं वजन साधारण 20 किलोग्रॅम आहे. आता हे नाणं भलेही गायब झालं असेल, पण हे नाणं भारतात तयार करण्यात आलं होतं. आता केंद्र सरकारने पुन्हा हे नाणं नव्याने शोधणं सुरू केलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने साधारण 4 दशकांआधीच या सोन्याच्या नाण्याचा शोध सुरू केला होता. पण सीबीआयला तेव्हा हे नाणं शोधण्यात यश मिळालं नाही. हे नाणं शेवटचं हैद्राबादमधील शाही परिवाराचे टायटलर निजाम VIII मुकर्रम जाहकडे बघण्यात आलं होतं. त्याने हे नाणं स्विस बॅंकेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. जाह याला हे नाणं शेवटचा निजाम आणि त्याचे आजोबा मीर उस्मान अली खान यांच्याकडून मिळालं होतं. सीबीआयने तो कथित लिलाव लोकेट करण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्यात यश मिळालं नाही.

असं सांगितलं जातं की, हे नाणं बादशाह जहांगीरने बनवून घेतलं होतं. इतिहासकार एचके शेरवानी सेंटर फॉर डेक्कन स्टडीजच्या प्रोफेसर सलमा अहमद फारूकी यांच्या हवाल्याने सांगितले की, या नाण्याचा 1987 मध्ये जिनेव्हामध्ये लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यूरोपमध्ये असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी याची माहिती भारत सरकारला दिली होती. त्यांनी या नाण्याचा लिलाव 1987 मध्ये जिनेव्हाच्या एका हॉटेलमध्ये होणार असल्याची सूचना मिळाली होती. सीबीआयने हे प्रकरण हाती घेतलं आणि चौकशी सुरू केली होती. पण नाण्याचा काही पत्ता लागला नाही.

ते म्हणाले की, सीबीआय अधिकाऱ्यांनी इतिहासकारांचं काम केलं.  त्या चौकशी सहभागी अनेक अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. सीबीआयचे माजी जॉइंट डायरेक्टर शांतनु सेन यांनीही या नाण्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यांनी सांगितलं की, बादशाह जहांगीरने दोन नाणी तयार केल्या होत्या. एक नाणं इराणचे शाहचे राजदूत यादगार अलीला देण्यात आलं होतं आणि दुसरं नाणं हैद्राबादच्या निजामाकडे होतं.

प्रोफेसर सलमा यांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, सीबीआयच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट XI ने 1987 मध्ये अ‍ॅंटीक अ‍ॅन्ड आर्ट ड्रेजर्स अ‍ॅक्टनुसार ही केस तयार केली होती. चौकशीतून समोर आली की, मुकर्रम जाहने 1987 मध्ये स्विस लिलावात सोन्याची दोन नाणी विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका नाण्याचं वजन 1 हजार तोळे होतं. 1987 मध्ये या नाण्याची व्हॅल्यू 16 मिलियन डॉलर अंदाजे ठरली होती. 

शांतनु सेन यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं की, बॅंक आणि मुकर्रम जाह यांच्यात झालेल्या संवादात लोनच्या बदल्यात दोन नाणी गहाण ठेवण्याचा उल्लेख होता. ही दोन्ही नाणी कॅरेबियात मेंढी पालनासाठी दोन कंपन्या क्रिस्टलर सर्व्हिसेज आणि टेमारिंड कॉर्पोरेशनच्या फायनान्सिंगसाठी गहाण ठेवण्याची बोलणी सुरू होती. ते म्हणाले की, आता तर अनेक वर्ष उलटून गेली आहेत. पण अजूनही या नाण्याबाबत काहीच समजलं नाही. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, केंद्र सरकारच्य प्रयत्नांना यश मिळेल.

टॅग्स :GoldसोनंhistoryइतिहासInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके