दिवाळी किंवा दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. दिव्यांचा हा सम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पण सण साजरा करताना आपण पर्यावरणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्षं करतो. दिवाळीमध्ये लावले जाणारे फटाके, प्लास्टिक किंवा केमिकलयुक्त वस्तू इत्यादींमुळे आपण सण उत्साहात साजरा करतो. पण पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतो. त्यामुळे यावर्षी इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा निश्चय करा. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्या इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करतील.
फटाक्यांपासून राहा दूर
सर्वात आधी फटाक्यांपासून दूर राहा. या गोष्टी क्षणिक असतात. या गोष्टी काही वेळाचा आनंद देतात. परंतु, पर्यावरणाला फार नुकसान पोहोचवतात. यांमुले पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी अनेक वर्षांचा अवधी लागतो. फटाक्यांमुळे फक्त वायू प्रदूषण होत नाही तर वयोवृद्ध माणसं आणि लहान मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
केमिकलयुक्त रांगोळी
साधारणतः बाजारामध्ये केमिकलयुक्त रांगोळीचे कलर्स मिळतात. त्याऐवजी नैसर्गिक कलर्स खरेदी करा. हे थोडे महाग मिळतात. पण पर्यावरण आणि आपलं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
प्लास्टिकच्या फुलांपासून दूर राहा
प्लास्टिकची फुलं स्वस्त मिळतात. परंतु, त्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणजे, खरी फुलं. खरी फुलं बायॉडिग्रेडेबल असतात. जी पर्यावरणाला अजिबात नुसान पोहोचवत नाहीत. तसेच प्लास्टिकची फुलं नष्ट करणं अवघड असतं.
मातीच्या दिव्यांचा वापर
इलेक्ट्रिक लाइट्सचा जास्त वापर करणं टाळा आणि त्याऐवजी मातीच्या दिव्यांचा वापर करा. मातीचे दिवे वापरल्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यास मदत होते.
डेकोरेशनसाठी इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करा
डेकोरेशनसाठी बाजारामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक किंवा पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या वस्तू मिळतात. याची जागा इको-फ्रेंडली मटेरियलसारख्या पेपर क्राफ्ट, ब्रॉन्झ किंवा माती यांसारख्या वस्तूंचा वापर करा.