आजकाल तरूण मुलं पबजीच्या, सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली दिसून येतात. आपली एक बाईक असावी असं प्रत्येकालाच वाटत असं. त्यासाठी अनेकांची मेहनत करून पैसे मिळवण्याची तयारी असते. बाईक म्हणजे स्वप्नांचा एक भाग असतो. पण तुम्ही स्वतः बाईक तयार करण्याचा विचार कधी केलाय का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलाबदद्ल सांगणार आहोत. ज्यानं शालेय शिक्षण घेत असतानाच स्वतःसाठी बाईकही तयार केली आहे.
गौरव नावाच्या या १० वीच्या मुलानं नावाप्रमाणे गौरव करावा अशी कामगिरी केली आहे. हा विद्यार्थी चंदीगडचा आहे. घरात किंवा दुकानात जमा झालेला भंडार आणि वापरात नसलेले वस्तूंचे पार्ट्स आपण टाकून देतो किंवा भंगारवाल्याकडे जमा करतो. या भंगाराच्या वस्तूंचे काय करता येईल याबाबत फारसा विचार होताना दिसून येत नाही. गौरवने भंगारांपासून नवी कोरी बाईक तयार केली आहे. ही बाईक पेट्रोलवर चालणारी असून १ लीटर पेट्रोलमध्ये ८० किलोमीटर चालते.
एएनआयनं या संबंधी ट्वीट केलं आहे. या ट्वीटला आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे ही बाईक दिसायलाही खूप छान आहे. एखाद्या महागड्या बाईकप्रमाणे या बाईकचा लूक आहे. ही बाईक चालवतानाचे फोटोही गौरवने शेअर केले आहेत. तीन वर्षांपूर्वीसुद्धा त्यानं अशीच एका बाईक तयार केली होती. त बाईक जास्त वेगानं चालत नव्हती. त्यानंतर ही बाईक तयार करण्यासाठी गौरव प्रयत्न करत होता. अखेर त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला.
हे पण वाचा-
"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल
बाबो! २ वर्षात ९ वेळा आई झाली ही महिला, आता पतीसोबत रोमान्स करायलाही मिळत नाही वेळ!