जसजशी टेक्नॉलॉजी विकास करत आहे वेगवेगळ्या समस्याही वाढत आहेत. आधी जेव्हा लोक प्रवास करत होते तेव्हा पाण्याची कोणतीही समस्या होत नव्हती. पाण्याची काहीना काही व्यवस्था मिळत होती. पण सध्या पाण्याची समस्या आहे. लोक प्रवासादरम्यान पाणी सोबत नेतात आणि जागोजागी पाण्याच्या बॉटलही मिळतात. पैसे देऊन तुम्ही सहजपणे पाणी खरेदी करू शकता.
जर प्रवासादरम्यान तुम्हीही पाणी खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. इतकंच नाही तर पाण्याची बॉटल तुम्ही विकत घेत असाल आणि त्या घरात जमा करून त्यांचा वापर करत असाल तरीही ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही नेहमी पाण्याची बॉटल विकत घेत असताना बॉटलच्या खाली लिहिलेला नंबर पाहूनच बॉटल खरेदी करावी किंवा वापरावी. आता तुम्ही विचार करत असाल की, हे काय नवीन आम्ही सांगतोय? तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर बॉटलच्या खालच्या बाजूला एक नंबर असतो. प्रत्येक नंबरचा एक खास अर्थ असतो.
त्रिकोणी बॉक्समध्ये लिहिला असतो नंबर
जेव्हाही तुम्ही प्लास्टिकच्या एखाद्या कंटेनरची खरेदी करता तेव्हा त्या बॉटलच्या खाली लक्ष देऊन बघा. तुम्हाला दिसेल की, बॉटलवर एक त्रिकोणी आकार बनलेला असतो. या बॉक्सच्या आत एक नंबर लिहिलेला असतो. या नंबरच्या आधारावर ठरवलं जाऊ शकतं की, प्लास्टिकची बॉटल किती सेफ आहे? या बॉटलवर लिहिलेल्या कोडचा एक अर्थ असतो. जर तुम्हाला एखादी अशी बॉटल दिसत असेल तर ती अजिबात रियूज करू नये. या बॉटल केवळ एकदाच यूज करायच्या.
काय असतो अर्थ
जर प्लास्टिकच्या बॉटलवर 3, 6 किंवा 7 नंबर लिहिला असेल त्या अजिबात पुन्हा वापरू नये. याचा अर्थ प्लास्टिकमध्ये घातक तत्व जसे की, बीपीए मिक्स आहे. जेव्हा असे नंबर असलेल्या बॉटल पुन्हा पुन्हा वापरल्या जातात तेव्हा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तेच काही बॉटलवर 2, 4 किंवा 5 लिहिलेलं असतं तेव्हा त्या सेफ असतात. तुम्ही या बॉटल रियूज करू शकतात. पुढच्या वेळी तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटल खरेदी करताना हे नंबर नक्की चेक करा.