(Image Credit : Aajtak)
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एक बकरा आपल्या काही गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. बकरी ईद देशभरात साजरी करण्यात येत आहे. अशात सांगलीतील एक बकरा त्याच्या डोक्यावर चंद्राची कोरीची आकृती असल्याने डिमांडमध्ये होता. आता हा बकरा त्यांची उंची, वजन आणि किंमतीमुळे चर्चेत आहे. या बकऱ्याची खासियत म्हणजे याची उंची ८ फूट आणि वजन १६० किलो आहे. हा बकरा कुर्बानीसाठी पंजाबच्या भिलाईमध्ये पोहोचला होता. त्याला बघण्यासाठी लोकांनी एकद गर्दी केली होती.
यावेळी लॉकडाऊन दरम्यान प्रशासनाच्या गाइडलाइननुसार बकरी ईदचा उत्सव साजरा केला गेला. बकरीदसाठी शहरात कुर्बानी म्हणजेच बळी देण्यासाठी अनेक बकरे आणण्यात आले होते. वेगवेगळ्या प्रजातीच्या बकऱ्यांची किंमतही हैराण करणारी असते. पण कोरोनामुळे लोक बाहेर न जाता ऑनलाईन बकऱ्यांची खरेदी करत आहेत.
दरम्यान शहरात एका बकऱ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. हा बकरा तोतापरी आणि जमनापरी क्रॉस प्रजातीचा आहे. दिसायला जेवढा तो खास आहे तेवढीच त्याची खासियत आहे. या बकऱ्याचे मालक आहेत लाल बहादूर आहेत. त्यांनी हा बकरा १.५३ लाख रूपयांना खरेदी केला.
मीडिया रिपोर्टनुसार, लाल बहादूर यांनी हा बकरा आठवड्याआधी पंजाबमधून आणला. त्यांनी सांगितले की, त्यांनी हा बकरा पंजाबहून खरेदी केला. १.५३ लाख रूपये किंमत असलेल्या या बकऱ्याला पंजाबहून आणण्यासाठी २३ हजार रूपये खर्च आला. या बकऱ्याचं वजन १६० किलो आहे.
बकऱ्याची उंची ८ फूट आहे आणि तो त्याची मान १० फूट उंचीवर घेऊन जाऊ शकतो. बकऱ्याच्या आहाराबाबत त्यांनी सांगितले की, फार वेगळं काही नाही पण या बकऱ्याला फळं आवडतात आणि ताज्या भाज्याही आवडीने खातो. त्यांनी सांगितले की, हा बकरा त्यांनी बळी देण्यासाठी आणलाय.
हे पण वाचा :
बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...
थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी...
अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!