खोकला ही एक कॉमन समस्या आहे. वेगवेगळ्या कारणांनी लोकांना खोकला येतो. आंबट काही खाल्लं किंवा जास्त थंड खाल्लं किंवा घशात इन्फेक्शन झालं असेल तर लोकांना खोकला येतो. औषधं घेतली तर खोकला बराही होतो. पण हाच खोकला तुमचं शरीरात सगळ्यात मजबूत हाड मोडू शकेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. असंच एका तरूणासोबत झालं. तेही केवळ खोकल्यामुळे.
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने शरीरात सगळ्यात मजबूत समजलं जाणारं हाड मोडून घेतलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. तेही केवळ खोकल्यामुळे. जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला आणि या घटनेबाबत सांगितलं तर डॉक्टरही हैराण झालेत. त्यांचा यावर विश्वासच बसला नाही की, केवळ खोकल्यामुळे असंही होऊ शकतं.
खोकल्यामुळे मोडलं मांडीचं हाड
चीनच्या फुजियान प्रांतातील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे एक अजब केस आली. इथे 35 वर्षीय एका व्यक्तीचं मांडीचं हाड केवळ खोकल्यामुळे मोडलंय. डॉक्टरही प्रश्नात पडले की, केवळ खोकल्यामुळे इतकं मजबूत हाड कसं मोडू शकतं? डॉक्टरांनी आधी या व्यक्तीचा एक्स-रे काढला ज्यातून हे स्पष्ट झालं की, मांडीचं हाड मोडलं आहे. नंतर त्यांनी व्यक्तीच्या लाइफस्टाईलबद्दल जाणून घेतलं. कशामुळे सगळ्यात मजबूत हाड कमजोर झालं हे जाणून घेतलं. यात हैराण करणारी ही होती की, बोन डेंसिटी टेस्टमध्ये व्यक्तीचं वय 80 वर्षाच्या वृद्धाऐवढी होती.
कशामुळे झालं असं?
वेगवेगळ्या टेस्ट केल्यावर समजलं की, त्याच्या हाडांना कोणताही रोग किंवा आजार नाही. पण त्याची हाडे कमजोर होण्याचं कारण सॉफ्ट ड्रिंक कोक किंवा कोल्ड ड्रिंक आहे. ही व्यक्ती खूप जास्त कोल्ड ड्रिंक पित होती. फास्ट फूड खात होता आणि एक्सरसाइज करत नव्हता. डॉक्टरांनी त्याला आता कोल्ड ड्रिंकऐवजी पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून त्याच्या शरीराल कॅल्शिअम मिळेल. डॉक्टरांनुसार, कोल्ड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक अॅसिड असतं, जे कॅल्शिअम शरीरात जाण्यापासून रोखतं. याच कारणाने हाडे कमजोर होतात.