शिंका येणं किंवा खोकला होणं या फार सामान्य समस्या मानल्या जातात. पावसाळ्यात तर खोकला किंवा सर्दी फारच कॉमन आहे. थोडं जरी डोकं पावसात भिजलं तर या समस्या होतात. पण कधी कधी खोकला असा होतो की, तो दिवसेंदिवस येत राहतो. जर खोकला जास्त दिवस जातच नसेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते.
एका व्यक्तीला गेल्या 2 वर्षापासून इतका खोकला येत होता की, त्याचा असा समज झाला की, त्याला कॅन्सर झाला. पण जेव्हा खोकला येण्याचं खरं कारण समोर आलं तेव्हा त्यालाही त्यावर विश्वास बसला नाही ना डॉक्टरांना. ही घटना चीनच्या जेजियांग प्रांतात राहणाऱ्य 54 वर्षीय व्यक्तीसोबत घडली.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, शु असं आवडनाव असलेल्या असलेल्या व्यक्तीला गेल्या दोन वर्षापासून खूप खोकला येत होता. या खोकल्याने तो वैतागला होता. त्याने अनेक उपचार केले आणि वेगवेगळी औषधेही घेतली. पण त्याचा खोकला काही बरा झाला नाही. अखेर तो ज़ेजियांग हॉस्पिटलमधील घशाच्या डॉक्टरकडे गेला. जेव्हा त्याचा स्कॅन करण्या आला तेव्हा व्यक्तीच्या फुप्फुसात 1 सेंटीमीटर मास दिसलं, जे निमोमिया आणि ट्यूमरचं कारण बनू शकलं असतं. डॉक्टरांनी कॅन्सरचीही शंका व्यक्त केली आणि सर्जरी करण्याची डेटही दिली.
डॉक्टर आधी व्यक्तीच्या फुप्फुसात असलेल्या मांसाच्या टिश्यूची टेस्ट करणार होते. जेणेकरून कॅन्सरची लेव्हल जाणून घ्यावी. पण जेव्हा त्यांनी सर्जरी केली तेव्हा त्यांना व्यक्तीच्या फुप्फुसात एक चिली पेपरचा वरचा भाग सापडला. जेव्हा शु याला याबाबत समजलं तेव्हा त्याने सांगितलं की, 2 वर्षाआधी हॉटपॉट खात असताना त्याचा घसा चोक झाला होता आणि तेव्हाच ही मिरची आत गेली असेल. ही मिरची टिश्यूच्या खाली दबलेली होती. त्यामुळे स्कॅनमध्ये ती दिसली नाही. तेच डॉक्टर या गोष्टीमुळे हैराण झाले की, ही व्यक्ती दोन वर्षापासून खोकला सहन कशी करत होती.