प्रेमाची वेगवेगळी उदाहरणे आपल्याला नेहमी बघायला मिळतात. प्रियकर आपल्या प्रेयसीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. पण प्रेयसी हयात नसेल तर काही महिन्यांनी तिची आठवणही काढली जात नाही. पण चीनच्या एका तरूणाने त्याच्या प्रेयसीची इच्छा तिच्या निधनानंतर पूर्ण केलीय. चीनच्या ३५ वर्षीय जू शिनान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या मृतदेहाशी लग्न केलं. यामागचं कारण वाचून तुम्हीही भावूक व्हाल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जू शिनाम आणि यांग लियू अनेक वर्षांपासून एकमेकांना पसंत करत होते. दोघांनी २०१३ मध्ये लग्नासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यानंतर त्यांना लग्नाची परवानगी मिळाली होती. पण याच्या तीन महिन्यानंतर यांगला ब्रेस्ट कॅन्सर झाला.
(Image Credit : Amar Ujala)
जवळपास चार वर्षे यांगची सर्जरी आणि कीमोथेरपी चालली. तिने कॅन्सरला मात दिली. पण एका वर्षाने पुन्हा तिला कॅन्सरने जाळ्यात घेतलं. पुन्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले. पण तिच्या स्थितीत काहीच सुधारणा झाली नाही.
रिपोर्ट्सनुसार, सहा ऑक्टोबर २०१९ ला यांग कोमात गेली. त्यानंतर १४ ऑक्टोबरला तिचं निधन झालं. जू ने सांगितले की, यांगचं निधन झाल्याच्या एक दिवस आधीच त्याला कळालं होतं की, यांगने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच लग्नासाठी एक गाउन पसंत केला होता.
आता यांग या जगात नव्हती. पण यू ने तिला एक सुंदर गाउन देण्याची आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्याने निर्णय घेतला की, तो यांगच्या लग्नाचं स्वप्न नक्की पूर्ण करणार. नंतर त्याने एक वेडिंग गाउन खरेदी केला आणि यांगच्या निधनाच्या एक आठवड्यानंतर डालियानमध्ये अंत्यसंस्कारावेळी तिला गाउन नेसवलं आणि लग्न केलं. तसेच त्याने तिथे फुलांचे १६९ बुकेही ठेवले होते.
यांगच्या मृत शरीरासोबत लग्न करून जू भावूक झाला होता. तो त्यावेळी म्हणाला की, 'तू म्हणायची की, जेव्हा तुझं निधन होईल तेव्हा कुणीही रडायचं नाही. पण मी स्वत:ला रडण्यापासून रोखू शकलो नाही'.