Pebbles Fried With Garlic: चीन हा देश आपल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि शोधांसाठी ओळखला जातो. चीनचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि अनोखा आहे. येथील खाण्याची तर फारच वेगळी आहे. येथील व्यावसायिक प्रथा नेहमीच लोकांना अचंबित करतात. चीनच्या लोकांनी पैसे कमावण्यासाठी सतत अनोख्या आणि अजब पद्धती शोधल्या आहेत. अशीच एक खाण्यासंबंधी वेगळी घटना समोर आली आहे.
चीनच्या हुनान प्रांतातील दुकानदारांनी पैसे कमावण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. मिरची, लसूण, पेरिला आणि रोजमेरीसारख्या गोष्टींसोबत नदीतील छोटे खडे खायला दिले जात आहेत. ही अनोखी डीश वेगळं खाद्य पदार्थ ट्राय करणाऱ्या लोकांना दिली जात आहे. हे लोक या वेगळ्या डीशच्या अनुभवासाठी दुकानदाराला साधारण 200 रूपये देण्यास तयार आहेत.
दुकानदाराने सांगितलं की, हे तळलेले खडे खाण्यासाठी नाहीत. लोक त्यांची टेस्ट घेण्यासाठी ते चोखू किंवा चघळू शकतात. इतकंच नाही तर त्यानंतर धुवून त्यांचा वापर करता येतो. एका दुकानदाराने साउथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की, हे खडे तीन पिढ्यांपर्यंत चालू शकतात. तो म्हणाला की, तीन पिढ्यां पिढ्यांपर्यंत हे खडे चालतात. तुम्ही जग सोडून जाल पण खडे तसेच राहतील'.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक बघून हैराण झाले आहेत. काही लोक यावर गंमतीदार कमेंट्स करत आहेत तर काहींना हे आवडलंय. चीनमध्ये "सुओ दीव"ला चोखणे आणि फेकणे असं म्हणतात. ही डिशही अशीच आहे. असं मानलं जातं की, हे खडे यांग्त्जी नदीच्या किनारी आढळतात. जेव्हा नाविकांना भूक लागत होती तेव्हा ते हे खडे चोखत होते.