जगात असे फार कमी लोकं असतात ज्यांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळतात. काही ईमानदार लोक या वस्तू परत करतात. अशा लोकांना त्यांच्या ईमानदारीसाठी बक्षीसही मिळतं. पण एका महिलेसोबत फारच अजब झालं. चीनमधील एका महिलेला एका व्यक्तीचा फोन सापडला तो तिने लगेच परत केला. अशात व्यक्तीने तिला त्याबदल्यात बक्षीस दिलं तर महिला खूश झाली. पण जेव्हा तिने पॅकेट उघडलं तेव्हा पोलिसांना बोलवावं लागलं.
महिलेने सांगितलं की, तिने एक दिवसाआधी हरवलेला आयफोन त्याच्या मालकाला परत केला होता आणि बक्षीस म्हणून तिला एक 35 हजार रूपयांचं पॅकेट मिळालं होतं. जेव्हा तिने ते उघडलं तेव्हा आढळलं की, त्यात बॅंक क्लार्क द्वारे पैसे मोजण्याचा सराव करण्याच्या नकली नोट होत्या.
महिलेने पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की, हे अपमानजनक आहे. पोलिसांनी फोनच्या मालकाला फोन केला. त्याने मान्य केलं की, त्याने महिलेला नकली नोटा मुद्दाम दिल्या होत्या. अशात वकिल म्हणाले की, बक्षीस म्हणून नकली नोटा देणं फसवणूक ठरू शकते.
महिलेने जोर देऊन सांगितलं की, तिने काहीच मागितलं नव्हतं. पण एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितलं की, फोनच्या मालकाने बक्षीस देणं एक रागाची प्रतिक्रिया होती. कारण महिलेने सुरूवातीला फोन परत करण्यास नकार दिला होता.
चीनच्या कायद्यानुसार कोणतीही हरवलेली वस्तू सापडली तर त्याचा पोलिसात रिपोर्ट दिला पाहिजे. तसेच वेळीच मालकाला ती वस्तू परत केली पाहिजे. यात हेही सांगण्यात आलं आहे की, मालकाने समोरच्या व्यक्तीला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे.