चीनच्या मध्य प्रांतातील हेनानमधील दोन भावंडांचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं जात आहे. त्या दोघांना त्यांच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या कचरापेटीतमध्ये 30 नवीन iPhone-14 पडलेले आढळले जे त्यांनी परत केले होते. फोनची किंमत 30,000 डॉलर म्हणजेच जवळपास 24,80,512 होती.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ही घटना 7 जुलै रोजी घडली. चाई असे आडनाव असलेल्या महिलेने सांगितले की, तिच्या धाकट्या भावाला दोन कचरापेटीमध्ये फोन सापडले होते, ज्याबद्दल त्याने मला सांगितले. यानंतर दोघांना एकूण 30 आयफोन मिळाले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना असे आढळले की ते फोन चुकून लियू नावाच्या डिलिव्हरी मॅनने ठेवले होते. कचरापेटीच्या वर लियूने पाच बॉक्स ठेवले होते, प्रत्येकामध्ये 10 नवीन आयफोन 14 प्रो मॉडेल्स होते परंतु तो ते घेण्यास विसरला. लियूच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याला त्याची चूक समजली तेव्हा त्याला प्रचंड भीती वाटली. तो सर्व फोनची किंमत कधीच देऊ शकणार नाही या विचाराने खूप घाबरला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की लियूने सोडलेले पाच बॉक्स दोन तासांनंतर एका महिला क्लिनरने फेकून दिले. लियूच्या कंपनीने क्लिनरशी संपर्क साधला तेव्हा त्याने कबूल केले की त्याने फक्त नंतर विकल्या जाणाऱ्या पुठ्ठ्याचे बॉक्स बाहेर काढले आणि सर्व फोन कचऱ्यातच ठेवले.
लियूच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ती महिला आयफोनच्या केसिंगपर्यंत पोहोचू शकली नाही आणि प्रत्येकी 2 युआन किमतीच्या बॉक्सच्या बदल्यात तिने 350,000 युआन किमतीचे फोन फेकून दिले. प्रामाणिकपणाबद्दल आता भाऊ आणि बहिणीची खूप प्रशंसा केली जात आहे. एक व्यक्ती म्हणाला, 'त्यांनी डिलिव्हरी मॅनचा जीव वाचवला.' तर दुसऱ्याने कमेंट केली, 'तुमचं ह्रदय फोनपेक्षा जास्त मौल्यवान आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.