शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

आगीत घाला किंवा उन्हात ठेवा! तरीही विरघळणार नाही हे आईसक्रीम, असं काय आहे यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 6:27 PM

चीननं असं आइस्क्रीम बनवलं आहे, की जे कडक उन्हातही वितळत नाही. सध्या या खास आइस्क्रीमची चायनीज सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

आइस्क्रीम  हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आइस्क्रीम खूप आवडतं; पण आइस्क्रीम खायला थोडा जास्त वेळ लागला, तर ते वितळायला लागतं. चीनने ही तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चीननं असं आइस्क्रीम बनवलं आहे, की जे कडक उन्हातही वितळत नाही. सध्या या खास आइस्क्रीमची चायनीज सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

सर्वसामान्यपणे फ्रीजरमधून बाहेर काढल्यानंतर आइस्क्रीम लगेच वितळण्यास सुरुवात होते. यावर चीनने एक खास उपाय शोधला आहे. चीनमधल्या प्रीमियम आइस्क्रीम कंपनीनं असं आइस्क्रीम तयार केलं आहे, जे 31 अंश सेल्सिअस तापमान असतानासुद्धा वितळत नाही. चीनमधल्या सोशल मीडियावर सध्या या आइस्क्रीमची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, या आइस्क्रीमवरून वादविवादही सुरू झाले आहेत. थंड आइस्क्रीम उष्णतेमुळं विरघळत नाही, ही गोष्ट चिनी नागरिकांच्या पचनी पडत नसल्याचं चित्र आहे. हे नेमकं कशामुळं घडतंय ते जाणून घेऊ या.

चीनमधल्या झोंगक्सुएगाओ  या प्रसिद्ध आइस्क्रीम कंपनीनं हे आइस्क्रीम तयार केलं आहे. चीनमध्ये ही कंपनी दर्जेदार उत्पादनांसाठी ओळखली जाते. चायनीज सोशल मीडियावर एका युझरने या कंपनीच्या आइस्क्रीमची थर्मामीटर टेस्ट करतानाचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात 31 अंश सेल्सिअस तापमानातही हे आइस्क्रीम वितळत नसल्याचं दिसत आहे. या तापमानात सुमारे दीड तास आइस्क्रीम ठेवलं, तरी ते वितळलं नाही, असा दावा केला गेला आहे. ही पोस्ट लक्षवेधी ठरली आणि अनेकांनी आइस्क्रीमची चाचणी घेण्यास सुरुवात केली. काहींनी टॉर्चनं तर काहींनी मेणबत्तीच्या ज्योतीमुळे आइस्क्रीम वितळतं का हे पाहण्याचा प्रयत्न केला; पण आइस्क्रीम वितळलं नाही. त्यामुळे आइस्क्रीमचा वरचा भाग जळला, पण आइस्क्रीम काही वितळलं नाही.

आइस्क्रीम का वितळलं नाही?या प्रकरणावर बराच गदारोळ झाल्यानंतर झोंगक्सुएगाओ कंपनीकडून सांगण्यात आलं की, या आइस्क्रीममध्ये घनता/चिकटपणा (Viscosity) वाढवणाऱ्या एजंटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आइस्क्रीम सहजासहजी वितळत नाही. हे आइस्क्रीम आरोग्यास हानिकारक नसून, राष्ट्रीय अन्न सुरक्षितता मानकांद्वारे प्रमाणित असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हा चीनचा प्रीमियम ब्रॅंड आहे. तसंच त्यांच्या स्वस्त आइस्क्रीमची किंमतदेखील सुमारे 150 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्यांनी आइस्क्रीमशी संबंधित माहिती ग्राहकांना दिली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके