बीजिंग:चीनने 2016 मध्ये अधिकृतपणे एक मूल धोरण (One Child Policy) रद्द केले होते. देशाची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हे धोरण 1980 मध्ये सुरू करण्यात आले होते. पण, 2021 पासून चीनने तीन अपत्य धोरण लागू केले आहे. चीन सरकार आता आपल्या नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की चीनची एक कंपनी आता तिसर्या मुलाला जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर बोनसरिपोर्ट्सनुसार, बीजिंग डबेनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुप(Beijing Dabeinong Technology Group) तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 90,000 युआन(सूमारे 11.50लाख) रोख बोनस ऑफर करत आहे. रोख बोनस व्यतिरिक्त, कंपनी महिला कर्मचाऱ्यांना एक वर्ष आणि पुरुष कर्मचाऱ्यांना नऊ महिने रजा देत आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या बाळावरही ऑफररिपोर्ट्समध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जे कर्मचारी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म देतात त्यांना 60,000 युआन म्हणजे अंदाजे 7 लाख रुपये बोनस मिळू शकतो आणि जर कोणी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तर त्यांना 30,000 युआनचा बोनस मिळेल म्हणजेच 3.50 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळेल.
चीन सरकार असे का करत आहे?एक मूल धोरणामुळे लिंग गुणोत्तरात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनला लोकसंख्येच्या विषमतेचा सामना करावा लागला आणि वृद्ध लोकसंख्येचे प्रमाणही वाढले आहे. वन चाइल्ड पॉलिसीमध्ये देशात मोठ्या प्रमाणात गर्भपातदेखील झाले. या कारणास्तव देशाने एक मूल धोरण रद्द केले.