आजकाल नेहमीच लहान मुलांच्या तस्करीच्या किंवा अपहरणाच्या अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. सध्या चीनमधून एक घटना समोर आली आहे. इथे एका कपलला त्यांचा मुलगा जन्माच्या काही वेळानंतर मरण पावल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता तीस वर्षानंतर हा मुलगा जिवंत त्यांच्यासमोर आला. मुळात हा मुलगा मरण पावलाच नव्हता. पूर्व चीनच्या अनहुई प्रांताती एका गरीब गावात वाढलेल्या ३३ वर्षीय झांग हुआइयुआन याला जेव्हा समजलं की, त्याला दत्तक घेण्यात आलं आहे तेव्हा त्याला धक्का बसला. त्याचे खरे आई-वडील चीनच्या झोजियांग प्रांतात राहतात. वडील एक श्रीमंत बिझनेसममॅन आहेत.
डॉक्टरांनी झांगच्या आई-वडिलांना सांगितलं की, प्रीमच्योर जन्मानंतर त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर खोटं बोलले होते. झांगला हॉस्पिटलच्या डायरेक्टरच्या खास नातेवाईला देण्यात आलं होतं. नातेवाईक महिला आई बनू शकत नव्हती.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, झांग झेजियांग प्रांतापासून जवळपास ४०० किलोमीटर दूर लहानाचा मोठा झाला. ज्या कपलने त्याला दत्तक घेतलं होतं त्यांचं वय ५० होतं आणि वडील दिव्यांग होते. त्यामुळे झांगला बालपणापासून गरीबीत जगावं लागलं. १७ वर्षाचा असताना त्याला शाळा सोडावी लागली होती. ज्यांनी दत्तक घेतलं त्या वडिलांच्या मृत्यूनंतर महिलेने २०२३मध्ये झांगला सांगितलं की, आम्ही तुझे खरी आई-वडील नाही. त्यानंतर झांग गेल्यावर्षी मे महिन्यात आपल्या खऱ्या आई-वडिलांना भेटला. यासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली. झांगच्या वडिलांनी त्याला १.२ मिलियन युआन म्हणजे १.३८ कोटी रूपये असलेल्या बॅंक अकाऊंटचं कार्ड दिलं. झांग त्यांचा दुसरा मुलगा आहे.
झांगच्या वडिलांनी सांगितलं की, "जेव्हा झांग होणार होता तेव्हा त्यांचा एक मुलगा एक वर्षाचा होता. तो सीजेरिअन द्वारे झाला होता. गर्भावस्थे दरम्यान सहाव्या महिन्यातच पत्नी टाके निघाले होते. त्यामुळे बाळ प्रीमच्योर झालं. डॉक्टरांनी त्याच्या जन्माच्या काही वेळांनी मुलगा मृत असल्याचं सांगितलं". इतकी वर्ष गरीबीत काढूनही झांग आता बिझनेस सांभाळत आहे. तो एका छोट्या फॅक्टरीचा मालक आहे. झांगला एक ९ वर्षाचा मुलगाही आहे.
त्याचे वडील म्हणाले की, "माझ्या मुलाने वयाच्या ३० वर्षापर्यंत त्याचा वाढदिवस साजरा केला नाही. यावेळी त्याचा वाढदिवस आम्ही सोबत मिळून साजरा करू". सोशल मीडियावर लोक या परिवाराच्या कहाणी अनेक कमेंट्स करत आहेत.