शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 1:49 PM

Chinese father teach 6 year old son maths : चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की, आपल्या मुलांना खूप अभ्यास करावा आणि परीक्षेत त्याला चांगले मार्क्स मिळावेत. हेही तितकंच खरं आहे एकट्या मुलांची परीक्षा नसते तर आई-वडिलांची देखील असते. त्यामुळे ते सुद्धा मुलांचा अभ्यास घेतात. पण काही मुलांची अभ्यासात मन लागण्याला एक लिमिट असते. चीनमधून (China) अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास (Chinese father teach 6 year old son maths) घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

सध्या सोशल मीडिया वीबोवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती कॅमेरासमोर ढसाढसा रडत आहे. मजेदार बाब ही आहे की, ही व्यक्ती अशा गोष्टीवर रडत आहे जी त्याच्या हातात नाही. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, हेनान प्रांतातील जेंगजाउमध्ये एका वडिलाला मोठा धक्का बसला. या व्यक्तीने पूर्ण वर्षभर आपल्या मुलाला मॅथ्स शिकवलं. त्याला वाटत होतं की, त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाने टॉप करावं.

इतके महिने आणि इतक्या मेहनतीने शिकवल्यानंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याची बोलती बंद झाली. त्याचं कारण त्याचा मुलगा परीक्षेत नापास झाला. 100 गुणांपैकी त्याला केवळ 6 गुण मिळाले. हे बघून वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं. वीबोवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आला आहे. मुलाचा गुण जेव्हा समोर आले तेव्हा वडिलाच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण त्याला केवळ 6 गुण मिळाले.

व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वडिलाने अनेक रात्री मुलाला शिकवण्यासाठी जागल्या होत्या. आता यूजर्स या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना वडिलाची बाजू घेतली. तर काही लोकांनी मुलाची बाजू घेतली. एकाने कमेंट केली की, त्यांना वडिलांचं दु:खं समजतं. ते एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, 'पुढे चांगलं करण्याचे आणखीही पर्याय आहेत'. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल