चीन हा एक अजब देश आहे. तेथील लोकांचे कारनामे हे नेहमीच समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना आता समोर आली आहे. एका मुलीला खेकडा चावला. यानंतर संतापलेल्या वडिलांनी बदला घेण्याचं ठरवलं. बदल्या घेण्यासाठी त्यांनी तो जिवंत खेकडाच खाल्ला आहे. जिवंत खेकडा खाल्ल्याने त्यांची स्थिती आता भयंकर झाली असून रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील पूर्वेकडील तटील प्रांतात राहणाऱ्या 39 वर्षीय के लू यांनी जिवंत खेकडा खाल्ला. दोन महिन्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. या घटनेच्या दोन महिन्यानंतर त्यांच्या पाठीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लू याचे मेडिकल रिपोर्ट तपासल्यानंतर त्याच्या छाती, पोट आणि लिव्हर आणि पचनसंस्थेत बदल झाल्याचे नमूद केले होते. मात्र असं नेमकं का घडलं याचं कारण मात्र सापडत नव्हतं.
डॉक्टरांनी कित्येकदा त्यांना याबाबत विचारलं होतं. तुम्ही काही चुकीचं खाल्लं होतं का? ज्यामुळे तुम्हाला एलर्जी होईल, त्यावर त्यांनी प्रत्येकवेळी नाहीच म्हटलं. मात्र लू यांच्या पत्नीने त्याने जिवंत खेकडा खाल्ला असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी त्यांना यामागचं कारणं विचारलं. लूने दिलेले कारण ऐकून डॉक्टरही काहीवेळासाठी हैराण झाले होते. मुलीला खेकडा चावल्याने मी बदला घेण्यासाठी जिवंत खेकडा खाल्ला, असं त्यांनी म्हटलं होतं.
एक छोटी नदी पार करत असताना लू यांच्या मुलीला खेकड्याने चावा घेतला. त्यामुळे रागाच्या भरात जिवंत खेकडा खाल्ला, असं त्यांनी कबुल केलं आहे. त्यानंतर लूची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याना तीन पॅरासिटिक इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं. कच्च मांस खाल्याने हा आजार होतो. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"