चीनमधून एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून या महिलेवर तिची जुळी मुले ६५ हजार युआन म्हणजेच साधारण ६.५ लाख रूपयांना विकण्याचा आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, या महिलेने तिच्या बाळांना विकून क्रेडिट कार्डचं बिल भरलं आणि स्वत:साठी एक नवीन स्मार्टफोनही खरेदी केला.
दोन वेगवेगळ्या लोकांना विकली मुले
डेली मेलने आणि Ningbo Evening News च्या रिपोर्टनुसार, महिलेचं वय २० वर्ष आहे. या महिलेने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तिच्या बाळांना विकलं होतं. महिलेने दोन मुले दोन वेगवेगळ्या परिवारांना विकले.
धक्कादायक कारण
रिपोर्ट्सनुसार, महिला लग्नाआधीच गर्भवती झाली होती. अशात तिच्या आई-वडिलांनी बाळांची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. तर बाळांचा पिता वु हा सुद्धा बाळांच्या जन्मावेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला नव्हता. महिलेवर भरपूर कर्ज होतं, अशात तिने दोन्ही बाळ विकण्याचा निर्णय घेतला.
बाळांच्या वडिलानेही मागितले पैसे
असे सांगितले जात आहे की, जेव्हा बाळांचा वडील वु याला मुले विकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यानेही महिलेकडे पैशाची मागणी केली. वु याला जुगाराची लत आहे आणि तोही कर्जा बुडालेला आहे. मात्र, महिलेने त्याला सांगितले की, तिने सगळे पैसे खर्च केलेत.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासणी सुरू केली. पोलिसांनी महिला आणि तिच्या पार्टनरला अटक केली. ज्यांना मुले विकण्यात आली होती, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आणि या गुन्ह्याची गंभीरता त्यांना सांगितली. त्यांनी मुले परत दिली. आता ही जुळी मुले महिलेच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आली आहेत. चीनच्या कायद्यानुसार, ही केस चाइल्ड ट्रॅफिकिंगची आहे. त्यामुळे महिलेला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.