(Image Credit : dailymail.co.uk)
चीनच्या शियामेन (Xiamen) शहरात एका महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. पण टेस्टमधून समोर आलं की, दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. जेव्हा बाळांच्या बर्थ रजिस्ट्रेशनसाठी पॅटर्निटी टेस्ट केली गेली, तेव्हा रिपोर्ट पाहून बाळाच्या वडिलांना धक्काच बसला.
डीएनए टेस्टमध्ये दोघांचाही डीएनए वेगवेगळा आढळला आहे. म्हणजे दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे होते. महिलेची विचारपूस केल्यावर तिने मान्य केले की, तिने पतीसोबत विश्वासघात केला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, बाळांच्या जन्मानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन पोलीस स्टेशनमध्ये करायचं होतं. रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी कपलला पुरावा म्हणून पॅटर्निटी टेस्टचा रिपोर्ट द्यायचा होता. त्यामुळे हे प्रकरण समोर आलं.
स्थानिक मीडियात रिपोर्टमध्ये असेही देण्यात आले आहे की, बाळांचे पिता शियाओलोंग सुरूवातीपासून एका बाळाबाबत शंका घेत होते. कारण त्याचा चेहरा वेगळा वाटत होता. पण जेव्हा डीएनए टेस्टचा रिपोर्ट समोर आला तेव्हा त्याला धक्का बसला. हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा पॅटर्निटी टेस्ट करण्यात आली.
कपल्सची पॅटर्निटी टेस्ट करणाऱ्या फुजियान झेंगतई फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या निर्देशकांनी सांगितले की, दोनपैकी एका बाळाचा डीएनए पिता शियाओलोंगसोबत मॅच झाला नाही. निर्देशक झांग यांनी सांगितले की, शियाओलोंग रिपोर्ट पाहताच चांगलाच संतापला होता आणि पत्नीसोबत भांडू लागला होता. सुरूवातीला तिने काहीच सांगितलं नाही.
जेव्हा शियाओलोंग याबाबत पत्नीला विचारपूस करत होता तेव्हा महिलेने पतीवर रिपोर्टसोबत छेडछाड केल्याचा आरोप लावला. पण काहीवेळाने सत्य समोर आलं. महिलेने एका अनोळखी व्यक्तीसोबत रात्र घालवल्याची बाब तिने मान्य केली. तिने हे सांगितले की, तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
यानंतर बाळांचा पिता शियाओलोंग याचं म्हणणं आहे की, तो दोन्ही बाळांचं पालन पोषण करायला तयार आहे. पण दुसऱ्याच्या मुलाला तो त्याचं नाव देणार नाही. मात्र आता पती-पत्नीने हे प्रकरण आपसात सोडवलं आहे. चीनमध्ये याआधीही अशा काही घटना समोर आल्या होत्या. जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे वडील असणं फार दुर्मिळ घटना आहे. याला हेटरपॅटर्नल सुपरफेकंडेशन नावाने ओळखलं जातं.
याबाबत डॉक्टर जॅग यांनी सांगितले की, ही फार स्पेशल केस आहे. या महिलेने पतीकडून गर्भवती झाल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवले. एक्सपर्ट्सनुसार, ही स्थिती तेव्हा तयार होते जेव्हा महिला एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी संबंध ठेवतात. त्यामुळे एकाच सायकलमध्ये दोन वेगवेगळ्या पुरूषांचे एग्स महिलेच्या गर्भात एकत्र फर्टिलाइज होतात.