चीनमधून सतत काहीना काही अशा घटना समोर येत असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. बाळांच्या जन्मामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. पण महिलेच्या पतीने बाळांची DNA टेस्ट करण्याचा विचार केला. या डीएनए टेस्ट रिपोर्टने त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला. इतकंच नाही तर डॉक्टरही रिपोर्ट पाहून हैराण झाले.
पत्नीची झाली पोलखोल
जुळ्या मुलांच्या डिलिव्हरीनंतर डॉक्टर तेव्हा हैराण झाले जेव्हा त्यांनी डीएनए रिपोर्ट पाहिला. DNA टेस्ट रिपोर्टमधून समोर आलं की, जुळ्या बाळांचा पिता एक नाही तर दोन आहेत. म्हणजे एकत्र जन्म घेणाऱ्या बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. DNA रिपोर्टमुळे दगा देणाऱ्या पत्नीची पोलखोल झाली आहे. पतीसमोर जेव्हा हे सगळं आलं तेव्हा त्यालाही धक्का बसला. (हे पण वाचा : लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे')
काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. पण चीन पॉप्युलेशन कंट्रोल पॉलिसीच्या वादावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात नवजात बाळांच्या बर्थ सर्टिफिकेटसाठी डीएनए टेस्ट केली गेली होती. यादरम्यान समजलं की, दोघांचा डीएनए वेगवेगळा होता. वडील होण्याचा आनंद साजरा करत असलेल्या महिलेच्या पतीला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांना धक्का बसला. तो म्हणाला की, त्याला कधीच समजलं की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. (हे पण वाचा : १२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य)
कसं झालं हे?
बाळांची टेस्ट करणारे डॉ. डेंग यजुं म्हणाले की, अशा केस फार दुर्मीळ असतात. डॉक्टरांनुसार, अशी केस करोडोमध्ये एखादीच होते. ते म्हणाले की, जेव्हा एका महिलेचं एकाच महिन्यात दोनदा ओवल्यूशन होतं आणि त्यानंतर कमी वेळाच्या अंतराने दोन्ही लोकांसोबत संबंध ठेवले जातात. तेव्हा अशा स्थिती महिला जुळ्या बाळांना जन्म तर देते. पण त्यांचे वडील वेगवेगळे असतात.