वॉशिंंग्टन : चॉकलेट, ब्रेड आणि च्युर्इंग गम आतड्याच्या पेशींची क्षमता कमी करते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. टाईटेनियम डायआॅक्साईड हे खाद्यपदार्थात फार पूर्वीपासून वापरतात. परंतू , आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात हे अनेकांना ठाऊक नसेल. अमेरिकेतील बिंघमटन विद्यापीठातील ग्रेचेन महलेर यांनी म्हटले की, यातील काही घटक आतड्याच्या कार्यात बदल घडवून आणतात. टायटेनियम डायआॅक्साईडला अमेरिकेतील अन्न व औषधी प्रशासनाने सुरक्षित ठरविले आहे. पण, हे पांढरा पेंट, कागद आणि प्लास्टिकमध्ये वापरले जाते. टूथपेस्टमध्येही याचा वापर केला जातो. चॉकलेट मऊ होण्यासाठी याचा वापर केला जातो.
च्युर्इंग गम, चॉकलेट, ब्रेड हानिकारक
By admin | Published: February 22, 2017 12:48 AM