ख्रिसमसचा (Christmas 2021) उत्सवाला सॅंटा क्लॉजची (Santa Claus) एन्ट्री झाल्याशिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. घर असो वा ऑफिस सगळ्या ठिकाणी लोक सॅंटा क्लॉजची वाट बघत असतात. लाल रंगाचे कपडे आणि पांढरी लांब दाढी असलेला सॅंटा त्याच्या पिशवीत खूपसारे गिफ्ट घेऊन येतो. असं असूनही अनेकांना हे माहीत नाही की, सॅंटा क्लॉज प्रत्यक्षातही होते. चला जाणून घेऊ कोण होते सॅंटा क्लॉज आणि त्यांचं ख्रिसमसला गिफ्ट वाटण्याचं कनेक्शन काय आहे.
लहानांपासून ते मोठ्यांना गिफ्ट वाटणारा सॅंटा काही काल्पनिक नाही. संत निकोलस यांना संत म्हणून ओळखलं जातं. संत निकोलस एक भिक्षु होते, जे दारोदारी फिरून गरीब आणि आजारी लोकांची मदत करायचे. ते यूरोपमधील सर्वात लोकप्रिय संतांपैकी एक होते.
फार पूर्वी अमेरिकेत ख्रिसमसकडे सुट्टीच्या रूपात पाहिलं जात नव्हतं आणि गिफ्टही देण्याची परंपरा नव्हती. अशाप्रकारे उत्सव साजरा करण्याची प्रथा इंग्लंडमध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून परिवारातील सगळे लोक एकत्र जमतात आणि एकत्र ख्रिसमस सेलिब्रेट करतात.
कसे दिसत होते सॅंटा?
अशी कल्पना केली जाते की, सॅंटा गोलमटोल दिसत होते. पण १८०९ मध्ये वॉशिंग्टन इर्विंग लेखकाने आपल्या पुस्तकात सॅंटाबाबत सांगितलं की, संत निकोलस एक स्लिम फिगर असलेले व्यक्ती होते, जे चांगल्या लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी येत होते.
नेहमी लाल कपडे घालत नव्हते
असं मानलं जातं की, सॅंटा नेहमी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये येतात. पण हे सत्य नाही. १९व्या शतकातील काही फोटोंमधून समजतं की, सॅंटा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कपडे घालत होते आणि झाडू घेऊन फिरत होते.
सॅंटाने लग्न केलं होतं का?
सॅंटा एक सिंगल आणि हसतमुख व्यक्ती होते, ज्यांना लहान मुलांना गिफ्ट द्यायला आवडत होतं. यावरून काही मतभेद आहेत. असं सांगितलं जातं की, काही वर्षांनी सॅंटाने जेम्स रीस नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. ती सुद्धा नंतर सॅंटाप्रमाणे प्रसिद्ध झाली होती.
सॉक्समध्ये ठेवून देतो गिफ्ट
असं म्हणतात की, सॅंटा लपून येतो आणि झोपलेल्या लहान मुलांच्या उशीखाली गिफ्ट ठेवून जातो. सॅंटा मुलांच्या सॉक्समध्येही गिफ्ट ठेवून जातो. त्यामुळेच अनेक ठिकाणी घराबाहेर सॉक्स टांगण्याची प्रथा आहे. जेणेकरून सॅंटा येईल त्यात गिफ्ट ठेवून जाईल.