(Image Credit : Medical News Today)
जास्तीत जास्त लोक नॉर्मल सिगारेट ओढतात. पण अलिकडे ई-सिगारेट ओढण्याकडेही अनेकांचा कल बघायला मिळतो. लोकांना वाटतं की, ई-सिगारेट ओढल्याने आरोग्यासंबंधी जास्त समस्या होत नाहीत. पण असं काही नाहीये हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. अशातच ई-सिगारेटशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अमेरिकेत एक १७ वर्षांचा मुलगा ई-सिगारेट ओढत होता. अचानक त्यांच्या तोंडात ई-सिगारेट फुटली. ई-सिगारेट फुटल्यामुळे त्याच्या जबड्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्याचे सगळे दात तुटून बाहेर आलेत. एकाएकी सिगारेट फुटल्याने त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. त्याला लगेच उटाह येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
रिपोर्ट्सनुसार, सिगारेटच्या स्फोटानंतर पीडित तरूण आपातकालीन केंद्रात पोहोचला. इथे त्याच्या सिटी स्कॅनच्या रिपोर्टमधून समोर आलं की, त्याच्या जबड्याचा चेंदामेंदा झालाय आणि त्याचे काही दातही बाहेर आलेत. डॉ. केटी रसेल यांनी सीएनएनला सांगितले की, लोकांनी अशी उपकरणे घेण्याआधी पूर्ण तपासणी केली पाहिजे. असे उपकरणे त्यांच्यासाठी चांगले नाहीत.
पीडित तरूणाने डॉक्टरला सांगितले की, मला लवकर बरं व्हायचं आहे. तर डॉक्टरांनी सांगितले की, सर्जरीदरम्यान त्याच्या तोडांचा काही भाग व्यवस्थित होत होता. ही अशाप्रकारची पहिलीच घटना नाही. याआधीही ई-सिगारेटच्या अशा घटना घडल्या आहेत. इतकेच नाही तर टेक्सासमध्ये ई-सिगारेटमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. ई-सिगारेट फुटल्याने त्याच्या तोंडातील कॅरोटिड धमणी फाटली होती. त्यामुळे त्याला मृत्यू झाला होता.