Cloud Burst Video: तुम्ही ढगफुटीच्या घटना घडलेल्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. ज्या भागात ढगफुटी होते, त्या भागात मोठा विद्धंस होतो. भारतात अनेकदा ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, डोंगराच्या मधोमध असलेल्या तलावात ढगफुटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निसर्गाचे हे विलक्षण दृष्य पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा ढगफुटीचा व्हिडिओ टाइम लॅप्स व्हिडिओ आहे. यात पर्वतांमध्ये ढग घिरट्या घालताना दिसतोय, यानंतर अचानकपणे ढगांमधून पाऊस पडू लागतो. काही वेळानंतर ढग एका तलावावर येतात आणि पाण्याचा साठा वाढत जातो. या व्हिडिओचे वर्णन हवामानशास्त्र आणि लँडस्केपचे परिपूर्ण संयोजन म्हणून केले जात आहे.
खरंतर हा व्हिडीओ 2018 सालचा आहे. जो पीटरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर एका व्यक्तीने लिहिले - जंगलातील आगीवर ढगफुटीच्या या घटनेची कल्पना करा. किती विलक्षण दृश्य असेल. दुसर्या युजरने लिहिले - देव स्वतःच्या सृष्टीला आंघोळ घालत आहे.