एक 39 वर्षीय महिला आधीच 19 मुलांची आई आहे आणि 20व्या वेळी ती पुन्हा गर्भवती झाली आहे. तिचं मत आहे की, ती पुढेही मुलांना जन्म देणं सुरू ठेवणार आहे. ती याकडे एक बिझनेस म्हणून बघते. महिला कोलंबियामध्ये राहते आणि तिचं मार्था आहे.
महिला म्हणते की, तिच्या प्रत्येक मुलाला कोलंबिया सरकारकडून आर्थिक मदत मिळते. 17 मुले 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत आणि परिवार 3 रूमच्या एका छोट्या घरात राहतो.
महिलेने डेली मेलसोबत बोलताना सांगितलं की, सरकार प्रत्येक मुलासाठी मदत करतं. सगळ्यांचा सांभाळ करण्यासाठी मला थोडे थोडे पैसे मिळतात.
कोलंबिया सरकार महिलेला दर महिन्याला 42 हजार रूपये देते. तसेच तिला स्थानिक चर्च आणि शेजाऱ्यांकडूनही मदत मिळते. पण तिला जे पैसे मिळतात ते मुलांचं संगोपन करण्यासाठी कमी पडतात. ती मुलांना पोटभर जेवणही देऊ शकत नाही.
ती सांगते की, सगळ्या मुलांना घरात झोपण्यासाठी जागा कमी पडते. याकडे एक बिझनेस म्हणून बघण्याबाबत ती म्हणाली की, ती तोपर्यंत मुलांना जन्म देणार जोपर्यंत शरीर अनुमती देईल. ती असंही म्हणाली की, ती याकडे एक बिझनेस म्हणून बघते.