आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरील (International Space Centre) अंतराळवीर (Astronaut) बॉब बेहेनकन यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये धूमकेतू (Comet Neowise or C/2020 F3 )स्पष्टपणे दिसत आहे. अंतराळवीर बॉब बेहेनकेन यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये बसून आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.
हा धूमकेतू पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ चमकताना दिसतो. इतकेच नाही तर या फोटोत तुम्ही धूमकेतूचा सुंदर प्रकाशही पाहू शकता. अंतराळवीर बॉब बेहेनकेन यांनी हा फोटो ट्विट करुन म्हटले आहे की, धूमकेतू पृथ्वीजवळ चमकत असल्याचे दिसून आले आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, अंतराळवीर बॉब बेहेनकेन यांनी पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत 31 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, हे खूपच सुंदर आहे. तर आणखी एकाने कमेंट्स केली आहे की, हे पाहणे खूप विशेष आहे.
रशियन अंतराळवीर इव्हान वॅग्नर यांनी धूमकेतूच्या प्रकाशावर भाष्य केले. जिथे सर्वत्र अंधार आहे तिथे या धूमकेतूचा प्रकाश फारच सुंदर दिसतो, असे इव्हान वॅग्नर यांनी म्हटले आहे. खगोलशास्त्रज्ञ केरी-अॅन लॅकी हेपबर्न म्हणाले, कॅनडाच्या अतिपरिचित भागातही धूमकेतू दिसू लागले आहेत. तसेच, त्याने हा व्हिडिओही शेअर केला आहे.
दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात पाहिले होते. त्यावेळी धूमकेतू बऱ्याच लांब होता आणि स्पष्ट दिसत नव्हता. सुरूवातीचा सूर्याच्या प्रकाशात वितळल्यानंतर तो अदृश्य होईल असे वाटले. परंतु असे घडले नाही आणि काळासह त्याची चमक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी याला लेबनॉनमध्ये पाहिला होता. असा अंदाज वर्तविला जात आहे की येत्या काळात त्याची चमक कमी होऊ शकते.
आणखी बातम्या...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण
"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"
'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर
घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता