एकतर आधीच कोरोनामुळे लोक हैराण आहेत. अशात स्प्राइट या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि जलजीऱ्याचं पाकीट असल्याची घटना समोर आली आहे. ही बॉटल पाहून दुकानदारासह आणि लोक अवाक् झालेत. दरम्यान खाद्य सुरक्षा प्रशासनाने बॉटल ताब्यात घेतली असून आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथील दुकानदार साधू वर्मा कोल्ड ड्रिंक एजन्सीकडून कोल्ड ड्रिंक घेऊन ग्राहकांना विकतात. 21 जूनला येथील एका ग्राहकाला कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि दुसऱ्या बॉटलमध्ये जलजीऱ्याचा पाउच मिळाला. हे बघून ग्राहक हैराण झाला. अशाच इतरही काही बॉटल्समध्ये इतरही काही पदार्थ आढळून आलेत. तर दुकानदाराने सर्व बॉटल्स तोडून फेकल्या.
दुकानदार साधू वर्मा ने एजन्सीच्या कस्टमर केअरवर तक्रार केली पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. अशात दुकानदाराने पुरावा म्हणून शिल्लक राहिलेल्या बॉटल सुरक्षित ठेवल्या आहेत. आता कोल्ड ड्रिंकमध्ये अशा वस्तू आढळून आल्याने आधी कोल्ड ड्रिंकचं सेवन केलेल्या लोकांमध्ये भीती पसरली आहे. ते घाबरलेले आहेत. अनेकांनी याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मागणी केलीये. जर बॉटलमध्ये विषारी पदार्थ मिळत राहिले तर लोक रस्त्यावरही येऊ शकतात. तसेच कोल्ड ड्रिंक पिणेही बंद करतील.
मुख्य खाद्य सुरक्षा अधिकारी इत्येंद्र मोहन त्रिपाठी यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच वेळीच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. पण काही दुकाने बंद होती. ज्यामुळे दुकानातील कोल्ड ड्रिंकच्या बॉटल मिळू शकल्या नाहीत. बॉटल मिळाल्यावर आवश्यक कारवाई केली जाईल.
कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी
बम बम भोले! नदी किनारी वाळूमध्ये सुरू होतो खोदकाम, शेकडो वर्ष जुनं शिव मंदिर सापडलं...