निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेत्यानं ४५ तासांत शोधली नवरी; कारण ऐकाल तर चक्रवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:26 PM2023-04-14T12:26:20+5:302023-04-14T12:26:58+5:30
लोकांनी मला आग्रह धरला होता परंतु मजबुरीने आता मला लग्न करावं लागतेय. माझे लग्न १५ एप्रिलला होणार आहे असं नेत्याने सांगितले.
रामपूर - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील आरक्षणामुळे अनेकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले आहे. परंतु काही नेत्यांनी वेगळाच जुगाड काढला आहे. मागील ३ दशकांपासून रामपूर नगरमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवणारे मामून शाह खान यांच्या आयुष्याची ४५ वर्ष झाली तरीही लग्न नाही. परंतु जेव्हा नगरपालिकेचं अध्यक्षपद एका महिलेला राखीव झाले तेव्हा स्वप्न भंगणार हे लक्षात आल्यानंतर काही तासांत त्यांनी अनोखा कारनामा केला आहे.
४५ वर्षीय मामून शाह खान यांनी ४५ तासांत लग्न केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १७ एप्रिलला होती. खान यांनी १५ एप्रिलला लग्न उरकून घेणार आहे. मामून शाह खान यांनी यंदा होणाऱ्या स्थानिक नगर पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तयारी केली होती. परंतु जेव्हा आरक्षण जाहीर झाले. तेव्हा रामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगले. कारण ही जागा महिलेसाठी आरक्षित झाली.
मामून शाह खान यांनी यातून अनोखा मार्ग निवडला आणि विनाउशीर करता नवरी शोधली. उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असताना मामून शाह खान यांनी लग्न उरकून घेणार आहेत. आता त्यांच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मामून शाह खान म्हणाले की, नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी मी केली होती. परंतु अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर माझी मजबुरी झाली. मी अनेक वर्षापासून संघर्ष करतोय आणि आजही जनतेसाठी काम करतोय.
त्याचसोबत लोकांनी मला आग्रह धरला होता परंतु मजबुरीने आता मला लग्न करावं लागतेय. माझे लग्न १५ एप्रिलला होणार आहे. माझी पत्नी निवडणूक लढेल. आता ती कोणत्या पक्षातून लढेल हे निश्चित नाही असं मामून शाह खान यांनी सांगितले.मात्र महिलांसाठी आरक्षित जागा झाल्याने काँग्रेस नेत्याला लग्न करून बायकोला उमेदवारी देत निवडणुकीत उभं करावं लागले याची चर्चा सध्या जिल्ह्यांसह राज्यभरात सुरू आहे.