Connection of Dholna Jewelery with Mughals : मुघलांची सत्ता आता जगात राहिलेली नाही. पण त्यांनी केलेल्या अत्याचारांची चर्चा आजही केली जाते. दुसऱ्या देशातून येऊन त्यांनी भारताचा खजिना तर लुटलाच सोबतच देशाची संस्कृती नष्ट करण्याचाही भरपूर प्रयत्न केला. त्यांच्या या अत्याचारांचं प्रतीक ढोलना (Dholna Jewel) सुद्धा आहे. मंगळसूत्रासारखा गळ्यात घातला जाणारा हा दागिना यूपी, बिहार, झारखंडमध्ये विवाहित महिलांसाठी निशाणी मानला जातो.
इतिहासकार सांगतात की, भारतात लग्न समारोहासहीत सगळीच चांगली कार्य दिवसाच होत होते. पण मुघल सैनिक सुंदर तरूणींना पळवून नेण्यासाठी लग्न-समारंभांवर हल्ला करत होते. त्यांच्या या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लग्ने दिवसाऐवजी रात्री करण्याचं चलन सुरू झालं. रात्रीच नवरींची पाठवणी केली जात होती. तरीही तरूणी सुरक्षित नव्हत्या.
बचावासाठी वेगळी आयडिया
अशात लोकांनी विचार करून एक मार्ग काढला. तरूणींच्या गळ्यात मंगळसुत्रासारखा ढोलना दागिना घातला जात होता. ढोलकाच्या आकाराच्या या दागिन्याला फार धार्मिक महत्व होतं. मुघलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अफवा पसरवली गेली की, ढोलाच्या आकाराच्या या दागिन्यात महिला डुकराचे केस भरून ठेवतात. मुस्लिम डुकराला अपशकुनी प्राणी मानतात. डुकराचे केस जवळ ठेवल्याने मुघल सैनिक अशा महिलांना हातही लावत नव्हते. त्यांच्या दागिन्यांनाही हात लावत नव्हते. रात्री नवरीच्या गळ्यात हा दागिना पाहून सैनिक त्यांच्यापासून दूर राहत होते.
या दागिन्याबाबत अनेक कथा आहेत. हा दागिना हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही महिला घातल होत्या. हिंदूंमध्ये याला ढोलना तर मुस्लिमांमध्ये याला तावीज म्हटलं जातं. जास्तीत जास्त मुघल सैनिक गळ्यात तावीज घालत होते. त्यांचा जोर तलवारीने लोकांना मारून जास्तीत जास्त हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास लावत होते. अशात मुघलांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी तावीजसारखा दिसणारा ढोलना गळ्यात घालण्याचं चलन वाढलं. ज्यानंतर स्वत:ला मुस्लिम असल्याचं सांगत महिला सुरक्षित निघून जात होत्या.
काही भागांमध्ये मर्यादित राहिली परंपरा
ढोलनाचा उदय कुठे झाला याबाबत लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. अनेक इतिहासकार सांगतात की, ढोलना एक राजस्थानी शब्द आहे. त्यामुळे ढोलनाचा उदय राजस्थानमध्ये झाला. नंतर याचा वापर बिहार, यूपी आणि झारखंडमध्ये सुरू झाला.
ढोलना मुळात लाल धाग्यात ढोलकाच्या आकाराचं एक छोट्या तावीजसारखा दागिना असतो. लग्नात सामान्यपणे नवरीच मोठा भाऊ त्यांना हे गिफ्ट करतो.