Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्हयात दोन पत्नींमध्ये फसलेल्या पतीने एका पत्नीवर त्याने विषारी साप सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दोनदा सापाने दंश मारल्यावर आणि विषाचं इंजेक्शन देऊनही पत्नी वाचली आणि नंतर पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि त्याच्या साथादीराला अटक केली.
पत्नीचा सापाच्या विषाने जीव गेला असता तर त्याचे विम्याने 4 लाख रूपये मिळणार होते. ते मिळण्यासाठी हा प्लान केला होता. पण अनेक प्रयत्न करूनही त्याला यश मिळालं नाही आणि आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे.
ही घटना सहा महिन्यांआधीची आहे. मंदसौर जिल्हा मुख्यालयाच्या यशोधर्मन नगरच्या हलीमाच्या हत्येचा कट पती मोजीम यानेच पहिली पत्नी मिळवण्याच्या नादात रचला होता. पण हलीमा वाचली. 2013 मध्ये मोजीम एनडीपीएसच्या एका केसमध्ये जोधपूर तुरूंगात कैद होता. तेव्हा त्याची पहिली पत्नी शानू बी घरातून दुसऱ्या पुरूषासोबत पळून गेली होती. मोजीमने दुसरं लग्न 2015 मध्ये हलीमासोबत केलं. हलीमा आणि मोजीम सोबत राहून लागले होते. पण काही दिवसांनी अचानक शानू बी चे फोन मोजीमला येऊ लागले होते. मोजीमचा तिच्यासोबत संपर्क वाढला आणि त्याने पुन्हा शानू बी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
शानू बी सोबत राहण्यासाठी मोजीमने हलीमासोबत भांडण केलं आणि हलीमाने त्याला घरातून काढण्याचा प्रयत्न केला. पण हलीमा कोणत्याही स्थितीत आपलं घर सोडण्यास तयार नव्हती. तिला विश्वास होता की, पती एक दिवस योग्य निर्णय घेईल. त्यामुळे ती सगळं सहन करत राहिली. त्या रात्रीची घटना आठवून हलीमा अजूनही घाबरते जेव्हा तिचा पती मोजीम आणि त्याच्या साथीदाराने तिच्यावर साप सोडण्याचा प्रयत्न केला. हलीमाचे वडील मोहम्मद सादिक यांनी सांगितलं की, शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की, त्यांच्या मुलीवर दंश मारण्यासाठी साप सोडण्यात आला आहे.
हलीमाच्या वडिलांनी सांगितलं की, स्थानिक स्तरावर मी मुलीवर उपचार केले. पण सगळ्यांनी तिची स्थिती जास्त खराब असल्याने तिला हायर सेंटरमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला. आता त्यांना तिच्या आरोपी पतीला कठोर शिक्षा व्हावी असं वाटतं.
हलीमाने सांगितलं की, माझा पती पहिल्या पत्नीसोबत बोलत होता आणि त्याला तिच्यासोबत रहायचं होतं. पण मला माझा परिवार सोडायचा नव्हता. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला सापाच्या मदतीने मारण्याचा प्रयत्न केला. मी कशीतरी शेजाऱ्यांना मदत मागितली आणि वडिलांना बोलवलं. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.