कोरोना व्हायरसने काही वर्षात फारच हैराण केलं. कोट्यावधी लोकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं. आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आणि प्रेग्नेंट महिलांना अधिक त्रास झाला. काही अशाही केसेस समोर आल्या ज्यात कोरोना पीडित महिलांनी निरोगी मुलांना जन्म दिला. पण आता एक याहून चक्रावून सोडणारी केस समोर आली आहे. एका कोरोना पीडित महिलेने कोमात असतानाच बाळाला जन्म दिला.
प्रेग्नेन्सी दरम्यान कोमात गेली महिला
अनवॅक्सीनेटेड महिला प्रेग्नेन्सी दरम्यान कोरोनाच्या जाळ्यात अडकली होती. तिची हालत इतकी बिघडली की, ती कोमात गेली. पण जेव्हा ती शुद्धीवर आली आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला तर महिलेच्या आनंदाला सीमा नव्हती.
The Sun च्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये राहणारी केल्सी राउट्स २८ आठवड्यांची गर्भवती होती. तिला श्वास घेण्याचा त्रास होता म्हणून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. टेस्ट केल्यावर तिला कोरोना झाल्याचंही समोर आलं. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेच्या शरीराला आराम मिळावा म्हणून त्यांनी तिला इंड्यूज्ड कोमात पाठवलं.
डॉक्टरांनी असा वाचवला जीव
केल्सी तेव्हाही बेशुद्धच होती जेव्हा डॉक्टरांनी एक इमरजन्सी सीजेरियन सेक्शन करून तिची डिलेव्हरी केली. केल्सीच्या डेटच्या १२ आठवड्याआधीच तिची डिलेव्हरी करण्यात आली. बाळाच्या जन्माच्या सात दिवसांनंतर ती कोमातून बाहेर आली. आपलं बाळ पाहून ती खूप आनंदी झाली होती.
शॉक्ड झाली महिला
महिला म्हणाली की, मला माहीत आहे डॉक्टरांनी मला आणि माझ्या मुलीला वाचवण्यासाठी हे केलं. पण मी शॉक्ड आहे. जे काही झालं त्याने आम्ही आनंदी आहोत. तीन बाळांची आई केल्सी म्हणाली की, हे एका चमत्कारासारखं होतं. डॉक्टरांनी माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवला.