शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus: 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार रस्त्यावरील गरीब; सरकारच्या निर्णयाने मिळाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 4:17 PM

सगळ्यात जास्त लॉकडाऊनचा फटका बसतोय तो म्हणजे हातावर पोट असलेल्या लोकांना.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरातील लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागून जगण्यासाठी लढावं लागत आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुद्धा जाहिर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये  लहान मोठ्या सर्वत्र उद्योजकांना, व्यापारी वर्गाला नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. सगळ्यात जास्त लॉकडाऊनचा फटका बसतोय तो म्हणजे हातावर पोट असलेल्या लोकांना. प्रत्येक देशात आपल्या देशातील समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत एका देशाने अनोखा प्रकल्प सुरू केला आहे.  या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर राहत असलेल्या आणि हक्काचा निवारा नसलेल्या लोकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.  कोरोना व्हायरसपासून या गरिब लोकांचा बचाव व्हावा यासाठी हे पाऊल उचललं आहे. 

ऑस्ट्रेलियामधील पर्थमध्ये हा प्रकार घडणार आहे. या ठिकाणी रस्त्यावर झोपत असलेल्या लोकांना महागड्या हॉटेल्समध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं २० हजार रुपये इतकं आहे.  ही योजना राबवण्याची तयारी पश्चिमी ऑस्टेलियातील सरकारने केली आहे. या अंतर्गत जवळपास १ महिना रस्त्यावर निवास असलेल्या लोकांना ५ स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. सुरूवातीला जवळपास २० लोकांना पॅन पॅसिफिक या हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने या प्रकल्पाला  विद हार्ट हे नाव दिलं आहे. यादरम्यान ऑस्टेलिया सरकार अशा लोकांचा शोध घेत आहेत. जे स्वतःचं विलगीकरणं करू शकत नाहीत. त्यानंतर या प्रकल्पात घरगुती हिंसाचाराचा सामना करत असलेल्या आणि मानसिक संतुलन बिघडलेल्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. यासाठी १२० खोल्याचा वापर केला जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. याद्वारे इतर सेवांवर पडणारा भार कमी होईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या