शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

coronavirus: प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनदरम्यान तिच्यासाठी त्याने मुंबईवरून गाठले मालवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 5:52 PM

लॉकडाऊनमुळे विरह सहन करावा लागत असल्याने अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था मधू इथे अन् चंद्र तिथे अशी झालेली आहे.

ठळक मुद्देएका प्रियकराने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईवरून थेट मालवण गाठले.प्रेयसीची भेट घेत तिला सोबत घेऊन परत येत असताना हे दोघेही प्रशासनाच्या तावडीत सापडले सदर तरुण हा मुंबईमधून आलेला असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण ३४ जणांना सिंधुदुर्गातील आरोग्य विभागाने होम क्वारेंटाइन केले

सिंधुदुर्ग/ रत्नागिरी - गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, या लॉकडाऊनचा फटका अनेक जणांना बसला असून, अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विरह सहन करावा लागत असल्याने अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था मधू इथे अन् चंद्र तिथे अशी झालेली आहे. अशाच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईवरून थेट मालवण गाठले. चालत, लपत छपत तो मालवणला पोहोचला. तिथे प्रेयसीची भेट घेत तिला सोबत घेऊन परत येत असताना हे दोघेही प्रशासनाच्या तावडीत सापडले आणि या सर्व प्रकाराचे बिंग फुटले.

एखाद्या भन्नाट प्रेमकथेला लाजवेल असा हा प्रकार समोर आला आहे. राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असताना कोरोना, पोलीस यापैकी कशाचीही भीती न बाळगता हा प्रियकर थेट मुंबईहून चालत, लपून छपून पोलीस आणि प्रशासनाचा पहारा चुकवून आडवाटेने तो प्रेयसीच्या गावी पोहोचला. तिथे गेल्यावर त्याने प्रेयसीची भेट घेतली. तसेच सदर युवतीच्या घराशेजारी असलेल्या घरात त्याने वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या योजनेप्रमाणे हा तरुण सदर युवतीस सोबत घेऊन तिच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन मुंबईत येण्यास निघाला.

यादरम्यान, मालवण आणि सिंधुदुर्गातील प्रशासनाला गुंगारा देत तो रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचला. मात्र जाताना सहजपणे गावी गेलेला हा तरुण मुंबईत येताना मात्र लांजा पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर पोलिसांन या प्रियकर प्रेयसीची रवानगी लांजा येथील क्वारेंटाइन सेंटरमध्ये केली आहे.

तसेच सदर तरुण हा मुंबई म्हणजेच कोरोनाच्या रेड झोनमधून आलेला असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या युवतीचे कुटुंबीय आणि या कुटंबाच्या घराशेजारील अजून तीन घरातील मिळून एकूण ३४ जणांना सिंधुदुर्गातील आरोग्य विभागाने होम क्वारेंटाइन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्गLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट