नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. परदेशातून परतलेल्या अनेकांच्या संपर्कात स्थानिक व्यक्ती आल्यानं कोरोनाचा वेगानं संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून देशात आलेल्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे. अनेकांना १४ दिवस होम क्वॉरेंटाईन राहण्याचे आदेश दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एक ट्विट व्हायरल झालं आहे. अभिजीत नावाच्या व्यक्तीनं हे ट्विट केलं असून त्यामध्ये दोन फोटो आहेत. अभिजीत यांनी ट्विट केलेल्या फोटोत काही लोक आणि पोलीस दिसत आहेत. यामध्ये दोन पुरुष दिसत असून त्यातला एक कॅमेऱ्याच्या दिशेनं बोट दाखवून संताप व्यक्त करतो आहे. फोटोत पोलीस दोन व्यक्तींची चौकशी करतानादेखील दिसत आहेत. अभिजीत यांनी घडलेला प्रकार ट्विटमध्ये लिहिला आहे. हा प्रकार वाचून अनेकांना हसू अनावर झालं आहे. या ट्विटला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून कित्येकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.
CoronaVirus: बंगळुरूतलं काम सांगून बँकॉकमध्ये मुक्काम; पोलीस दारी येताच नवऱ्यांची दाणादाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:02 PM