(प्रातिनिधीक छायाचित्र)
जगातील वेगवेगळ्या देशांसोबतच पाकिस्तानमध्येही कोरोनाने थैमान घातलं आहे. इथे तर इतकी वाईट परिस्थिती आहे की, लोकांसाठी मास्क किंवा कोणत्याही वैद्यकिय सेवा नाहीत. अशात येथील मुल्तान शहरात क्वारेंटाईनमध्ये असलेल्या लोकांनी प्रशासनाला हैराण करून सोडलं आहे. कारण हे लोक प्रशासनाकडे एकापाठोपाठ एक विचित्र मागण्या करत आहेत. लोकांच्या या मागण्या वाचून हे लोक फिरायला आल्यासारखे वागत असल्याचं दिसून येतंय.
(Image Credit : dw.com)
'उर्दू पॉइंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, क्वारेंटाईनमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी 16 लोकांनी मागणी केली आहे की, त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली जावी.
पत्नीसोबत कॅरम, लूडोची मागणी
क्वारेंटाईनमध्ये राहणारे लोक दररोज वेगवेगळ्या मागण्या करत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत काही रूग्णांचं मत आहे की, क्वारेंटाईन सेंटरमध्ये वेळ जात नाही. त्यामुळे पत्नींना सोबत राहण्याची परवानगी दिली जावी. तसेच त्यांनी वेळ घालवण्यासाठी कॅरम आणि लूडो गेमचीही मागणी केली आहे. तर काही लोकांना मुलायम बेडची सुद्धा मागणी केली आहे.
खाण्याबाबत मागण्या...
काही लोकांनी खाण्याबाबतही काही मागण्या केल्या आहेत. काही लोकांनी मागणी केली आहे की, त्यांना पांढऱ्या पिठाच्या चपात्या दिल्या जाव्यात तर काहींनी ब्राउन पिठाच्या चपात्यांची मागणी केली आहे. आता या मागण्यांमुळे प्रशासन हैराण होणार नाही तर काय होणार. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोकांनी उपलब्ध त्या सुविधा दिल्या जात आहेत. पण पत्नींबाबत काही प्रतिक्रिया समोर आली नाही.
हे नक्की आहे की, ज्यांना क्वारेंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे असं करणं या लोकांच्या परिवारातील लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं. दरम्यान इथे इराणहून येणाऱ्या कोरोना संशयितांना वेगवेगळ्या शहरातील क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जात आहे.