Village Sold in 3 Crores: जगातील सगळ्याच लोकांना आपल्यासाठी एक सुंदर घर हवं असतं. ज्यात निदान आवश्यक गोष्टी असाव्यात. जर कुणालाही त्यांच्या बजेटमध्ये लक्झरी आणि मोकळं घर मिळेल तर कुणीही डील फायनल करतील. एका ब्रिटीश कपलने सुद्धा असंच केलं आणि एका आलिशान घराच्या किंमतीत फ्रान्समध्ये जाऊन एक पूर्ण गाव खरेदी केलं.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं कसं? आलिशान बंगल्याच्या किंमतीत पूर्ण गाव कसं मिळू शकतं? मिररच्या रिपोर्टनुसार, पश्चिम इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या कपलला ही डील मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. मॅनचेस्टरमधील त्यांचं तीन बेडरूमचं घर त्यांनी विकलं आणि त्या पैशातून फ्रान्समध्ये पूर्ण गाव खरेदी केलं.
रेडियो इंडस्ट्रीमध्ये काम करणारं कपल लिज आणि डेविड मर्फी यांनी आपलं घर 4 कोटी 14 लाख रूपयांना विकलं. ज्यात केवळ 3 बेडरूम होते. त्यांनी 3 कोटींपेक्षा थोडी जास्त रक्कम देत एका छोटं गाव खरेदी केलं. या गावातील पडकी घरे साधारण 400 वर्ष जुनी आहेत. आता इथे त्यांनी त्यांच्या परिवारांच्या सदस्यांनाही शिफ्ट केलं आणि आपल्या दोन मुलांसोबत स्वत:ही शिफ्ट झाले. पण त्यांना रिनोवेशनवर बराच पैसा खर्च करावा लागला आहे.
या कपलचा प्लान हा आहे की, ते तेथील काही घरांमध्ये स्वत: राहतील. तर काही घरांचं काम करून ते हॉलिडे होम्स म्हणून रेंटवर देतील. यातून त्यांना लाखो रूपयांची कमाई होईल. कपल नोकरीमुळे आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ते आनंदी नव्हते. अशात इथे येऊन ते आनंदी आहेत आणि त्यांना कधी परत जायचं नाहीये. घरांसोबत त्यांच्याकडे बरीच जमीन आणि स्वीमिंग पूलही आहे.