लोकांसाठी त्यांच्या जुन्या गोष्टी खूप मौल्यवान असतात. ते सहाजिकच आहे, कारण शेवटी या जुन्या गोष्टी त्यांच्या मागील पिढ्यांपासून आलेल्या असतात. लोक त्यांचा वारसा जपतात. मात्र, कधी कधी लोकांना इच्छा नसतानाही आपल्या या गोष्टी विकाव्या लागतात. असंच कोणीतरी आपला वडिलोपार्जित वारसा यूकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला विकला. पण नंतर नवीन खरेदीदाराला घराच्या खाली लपलेलं दुसरं जग दिसलं. हे घर १९०० च्या सुमारास बांधलं गेलं. इतक्या वर्षांनंतर घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. मात्र या घराच्या नूतनीकरणादरम्यान असं काही घडलं की सगळेच आश्चर्यचकित झाले..
बेन मन आणि त्यांची पत्नी किम्बरले यांनी हे घर २०२० मध्ये विकत घेतलं होतं. त्यांनी गेल्या वर्षी या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. यादरम्यान, जेव्हा त्यांनी आपल्या बेडरूमच्या खाली पडलेलं कार्पेट साफ करण्यासाठी उचललं, तेव्हा या घरातील रहस्याचा खुलासा झाला. कार्पेटखालील फरशी लाकडाची होती जी तुटलेली होती. त्यामुळे कार्पेट उचलताच त्याखाली एक शिडी दिसली. ही शिडी नेमकी कुठे जाते, याची दोघांनाही कल्पना नव्हती. (Couple Found Secret Room in Old House)
३९ वर्षाच्या बेनने या शिडीवरुन खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली जाताच त्यांना एक वेगळंच जग दिसलं. खाली विटांनी बनवलेली एक रूम होती, ज्यात आधी वाईन एकत्र करून ठेवल्या जात असे. बेनने द मिररला सांगितलं की जर त्याची नजर या तुटलेल्या फरशीवर गेली नसती तर या रूमबाबत कदाचित कधीच खुलासा झाला नसता. हा भाग बऱ्याच प्रमाणात सडलेला होता आणि पाणी तसंच ओल्यामुळे इथे दुर्गंधीही होती. मात्र, या कपलने आता हा भाग पूर्णपणे स्वच्छ केला आहे.
कपलने याचं नाव मन गुफा असं ठेवलं आहे. बेनने सांगितलं की ही रूम अनेक जुन्या वस्तूंनी रिनोवेट केली आहे. सगळ्या मोठी बाब म्हणजे या घराचं पूर्ण रिनोवेशन या कपलनेच केलं आहे. यामुळे त्यांचे भरपूर पैसे वाचले आहेत. या सिक्रेट रूमबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.