(Image Credit : newindianexpress.com)
लग्नं तर तुम्ही अनेक पाहिली असतील. पण ओडिशाच्या भुवनेश्वरमधील एका वेगळ्या लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. भारतीय लग्नांमध्य डेकोरेशन आणि जेवण यांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. इतकंच नाही तर खूप जास्त अन्नही वाया जातं. पण भुवनेश्वरमध्ये झालेल्या एका लग्नाने लोकांना एक नवा विचार दिला आहे जो काबिल-ए-तारीफ आहे. 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, Eureka Apta आणि त्याची पत्नी Joana ने लग्नाच्या निमित्ताने मित्र आणि नातेवाईकांना जेऊ घालण्याऐवजी ५०० मुक्या जनावरांना जेऊ घातलं आणि लोकांचं मन जिंकलं.
आधी हे ठरलं होतं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कपलने तीन वर्षांआधीच एकमेकांना वचन दिलं होतं. Eureka Apta व्यवसायान एक इंडिपेंडेंट फिल्ममेकर आहे. तर त्याची पत्नी Joana ही एक डेंटिस्ट आहे. दोघांनी एनिमल वेलफेअर NGO Ekmara च्या मदतीने जनावरांचं पोट भरलं आणि या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही पैसेही त्यांनी NGO ला दान केले. (सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...)
कशी सुचली ही आयडिया
लग्नाच्या दोन दिवसांआधी कपलने एका एनिमल शेल्टरमध्ये जाऊन प्राण्यांसाठी औषधे आणि जेवण दान केलं होतं. आता जेव्हा ते २५ सप्टेंबरला लग्न करत होते तेव्हा शहरातील मोकाट कुत्री आणि इतर प्राण्यांचं पोट भरलं जात होतं. या विचारामागे Eureka ची होती. त्याच्या आईचं काही महिन्यांपूर्वी कॅन्सरने निधन झालं. मुलाला आईला श्रद्धांजली द्यायची होती. त्यामुळे त्याने या चांगल्या कामासाठी त्याने त्याच्या जीवनातील सर्वात खास दिवस निवडला. (१ नंबर! रडणाऱ्या आजोबांच्या 'बाबा का ढाबा'ची होणार होम डिलिव्हरी, आता Zomato वर लिस्टेट)
पुढेही करणार मदत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपलने या वर्षाच्या सुरूवातीलाच एका कुत्र्याचा जीव वाचवला होता. हा कुत्रा अपघातात जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्यासाठी शेल्टर शोधत असताना Ekmara NGO बाबत त्यांना माहिती मिळाली. या मुक्या जनावराची हालत पाहून ते निराश झाले होते आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला होता की, ते प्राण्यांच्या मदतीसाठी चॅरिटी करतील. कपलने जीवनाच्या नव्या सुरूवातीसोबत प्राण्यांच्या मदतीचं कामही सुरू करण्याचा निश्चय केला आहे.