शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

फक्त ४० हजार रुपयांत कियाराने उरकलं लग्न, ड्रेसही फक्त ३ हजार ५०० रुपयाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 6:53 PM

एका कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या कपलने अवघ्या ४० हजारांच्या आतच आपलं लग्न उरकलं आहे. अगदी लग्नाच्या ड्रेसपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंत सर्वकाही यामध्येच नीटपणे पार पडलं (Budget friendly wedding tips).

लग्न म्हटलं की त्याचा खर्च लाखात असतो. कुणी काही हजारात अगदी व्यवस्थितपणे लग्नसोहळा आटोपला असं सांगितलं तर साहजिकच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण अशाच एका कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या कपलने अवघ्या ४० हजारांच्या आतच आपलं लग्न उरकलं आहे. अगदी लग्नाच्या ड्रेसपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंत सर्वकाही यामध्येच नीटपणे पार पडलं (Budget friendly wedding tips).

लॉस एंजिल्समधील कियारा आणि जोएल ब्रोकनब्रू या कपलच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करणं त्यांना पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी कमीत कमी पैशातही चांगलं कसं काय करता येईल यावर जोर दिला आणि त्यांच्या लग्नाला फक्त ३८ हजार रुपये लागले.

आता त्यांनी काही हजारात लग्न कसं काय केलं, हा सर्वांना पडलेला प्रश्न. आता लग्नात सर्वात पहिलं समोर येतं ते म्हणजे लग्नाचा ड्रेस. जो खासकरून नवरीसाठी खूप स्पेशल असतो. आपला ड्रेस सर्वांपेक्षा वेगळा असावा याकडे नवरीबाईचा कल असतो. त्यासाठी मोठ्या दुकानांमध्ये जाऊन लग्नाच्या कपड्यांची खरेदी केली जाते किंवा स्पेशल ड्रेस बनवून घेतला जातो. पण कियाराने आपल्या लग्नाचा ज्रेस ऑनलाइन खरेदी केला. फक्त ३ हजार ५०० रुपयांचा वेडिंग ड्रेस तिने मागवला. कारण लग्नाचे काही तासच हा ड्रेस घालणार असल्याने या ड्रेसवर जास्त पैसे तिला खर्च करण्याची गरज वाटली नाही. तिने या ड्रेसचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरही शेअर केला जो लोकांना खूप आवडला.

रिपोर्टनुसार त्यांनी आपल्या लग्नात मोजक्याच लोकांना बोलावलं. म्हणजे काही पाहुणे आणि जवळचे मित्रमैत्रिणी नातेवाईक असे मिळून ७५ पेक्षाही कमी पाहुण्यांना त्यांनी आपल्या लग्नाचं आमंत्रण दिलं. शिवाय आवश्यक त्या गोष्टी पुरवण्यात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची मदत केली.

वायफळ खर्च न करता अगदी मर्यादित मार्गाने लग्न करण्याची कपलची ही आयडिया लोकांना खूप आवडली आहे. बहुतेकांनी या कपलचं कौतुक केलं आहे. असं लग्न सर्वांनी करायला हवं अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके