सध्याच्या काळात फेसबुक हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक घटक बनला आहे. लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत अनेकजण फेसबुक वापरतात. फेसबुकचा युझर्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र या फेसबुकला विनाकारण एका व्यक्तीचे खाते बंद करणे महागात पडले आहे. अकाउंट बंद केल्यानंतर या व्यक्तीने फेसबुकविरोधात खटला दाखल केला होता. केस जिंकल्यानंतर आता फेसबुकला या व्यक्तीला ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ४१ लाख ११ हजार २५० रुपये भरपाई द्यावी लागणार आहे.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, फेसबुकने कोलंबसचे रहिवासी जेसन क्रॉफर्डचे फेसबुक खाते बंद केले होते. जेसन म्हणाला की, एके दिवशी जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा माझे फेसबुक अकाउंट बंद होते. मला माझ्या फेसबुक अकाउंटवर लॉग इन करता आले नाही. माझ्या फेसबुक अकाऊंटवर अनेक वैयक्तिक फोटो सेव्ह होते. माझ्या अकाऊंटनं फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खाते बंद केल्याचे लिहिले होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकदा मी फेसबुकची मूळ कंपनी मेटाशी संपर्क साधला आहे. पण माझ्या एकाही मेसेजला फेसबुककडून उत्तर आले नाही.
कंटाळून फेसबुकविरोधात दाखल केला खटलाफेसबुकने मेसेजला प्रतिसाद न दिल्याने नाराज झालेल्या जेसनने २०२२ मध्ये फेसबुक कंपनीच्या निष्काळजीपणासाठी खटला दाखल केला. गुन्हा दाखल करूनही फेसबुककडून प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात न्यायाधीशांनी मेटाला ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ४१ लाख ११ हजार २५० रुपये भरपाईचे आदेश दिले. यानंतर कंपनीने जेसनचे अकाऊंट पुन्हा सुरू केल्याचे कळवले परंतु हे प्रकरण अजून संपलेले नाही. कारण फेसबुक न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करत नाही. फेसबुकने अजून एक डॉलरही भरलेला नाही असं जेसनने सांगितले.
सोशल मीडियावर चर्चासध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कंपनीने कोणतेही कारण नसताना खाते बंद करू नये असे लोकांचे म्हणणे आहे. आजकाल लोकांच्या खात्यात भरपूर वैयक्तिक डेटा असतो. यामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो असं युझर्स म्हणाले.