जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोरोना नाही हे सिद्ध करण्यासाठी एका व्यक्तीने चक्का एटीएम कॅश मशीन (ATM Cash Machines) चाटल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सर्वच जण हैराण झाले आहेत.
अमेरिकेत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीम दरम्यान एटीएम मशीन चाटतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. फेसबुकवर एका युजरने हा व्हिडीओ पाहिल्यावर दक्षिण यॉर्कशायर पोलिसांना याची माहिती दिली. तसेच त्या युजरने याआधी ही अशीच घटना घडल्याचा दावा केला आहे. तसेच एटीएम चाटणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांदा ते चाटलं असून त्याला या कृतीतून कोरोना नाही हे सिद्ध करायचं असल्याचं म्हटलं जात आहे. मशीन चाटतानाचा हा व्हिडीओ सध्या फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. दक्षिण यॉर्कशायर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा विळखा! जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनासमोर हतबल झाला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाची चिंताही वाढली आहे. रशिया, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली, तुर्की, जर्मनी आणि कोलंबियासारख्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 20 लाखांहून अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.