एका महिलेने स्वत:चा एक विचित्र असा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. कावळ्याने महिलेचं जगणंच अवघड केलं आहे. अंघोळ करतानाही पाठ सोडत नाही. यामुळे महिला तणावात असल्याचं म्हटलं आहे. सोफी जोन्स असं या महिलेचं नाव आहे. ही 34 वर्षांची महिला एका कावळ्यामुळे त्रस्त आहे. कावळा अंघोळ करताना तिच्याकडे एकटक पाहत राहातो. कावळ्याच्या या कृतीमुळे महिला प्रचंड तणावात आहे. कावळ्यामुळे आता ती नैराश्येत जाईल अशी भीती तिला जाणवत आहे.
द सने दिलेल्या वृत्तानुसार, हा कावळा गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत आहे. तो सतत तिच्याकडे एकटक पाहात असतो. ती किचनमध्ये गेली तर खिडकीवर येतो, ती बेडरुममध्ये गेली तर बाल्कनीत येऊन बसतो. ती अंघोळ करायला गेली तरी देखील तिचा पाठलाग काही तो सोडत नाही. कारने प्रवास करायला लागली तरी कारच्या खिडकीवर येऊन चोच मारत बसतो. त्यांच्या या सवयीमुळे सोफी प्रचंड घाबरली आहे. तिला घराबाहेर पडण्याची भीती वाटते.
एक दिवस हा कावळा तिच्यावर हल्ला करेल अशी भीती तिला वाटतेय. कारण गेल्या काही दिवसांपासून तो सोफीच्या शेजाऱ्यांवर हल्ला करत आहे. जो कोणी व्यक्ती कावळ्याला दिसतो त्याच्यावर कावळा हल्ला करतो. काही दिवसांपूर्वी ती सन बाथ घेत होती तेव्हा सुद्धा कावळा समोरच्या गेटवर बसून तिच्याकडे एकटक पाहात होता. सोफी एक सिंगल वुमन आहे. त्यामुळे तिला आता घरात एकटं राहायला भीती वाटते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.