ब्रेकअपनंतर एका मुलीला तिच्या प्रियकराचा राग आला आणि तिने थेट पोलिसांनाच फोन केल्याची घटना आता समोर आली आहे. हे कपल 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं. पण नुकताच मुलगा तिच्यापासून वेगळा झाला. त्याने काहीही न सांगता संबंध तोडल्याचा आरोप मुलीने केला आहे. यामुळे मुलाचा शोध घेण्यासाठी तिने पोलिसांशी संपर्क साधला. ही घटना चीनी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हे प्रकरण पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताशी संबंधित आहे. जिथे गेल्या आठवड्यात एका मुलीने पोलिसांना फोन करून अजब मागणी केली. मुलीने पोलिसांना तिच्या एक्स प्रियकराचा शोध घेण्यास सांगितले. 6 वर्षांचे नाते तोडून प्रियकर न सांगता गायब झाला, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, असं ती म्हणाली. प्रियकराने तिच्यासोबत नेमकं का ब्रेकअप केलं, याचा शोध घेण्यासही तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने मुलीला त्याला शोधणं आवश्यक आहे का? असा प्रश्न विचारला. यावर रडत रडत मुलीने मला समजत नाही की तो माझ्याशी असं का वागला? मला हेच जाणून घ्यायचं आहे असं उत्तर दिलं. यानंतर पोलिस अधिकाऱ्याने विचारले - "जर त्याने (बॉयफ्रेंड) तुला आधीच खूप दुखावले असेल तर तुला तो पुन्हा का हवा आहे? या समस्येचे मूळ काय आहे हे तुला माहीत असले पाहिजे."
"तरुणाला तुझा गैरफायदा घेण्याची संधी देऊ नकोस. तू अनलकी आहेस असं समजू नको. आपण भाग्यवान आहोत असा विचार कर. कदाचित 'योग्य माणूस' तुमची वाट पाहत असेल" असं म्हटलं आहे. प्रियकराचा फोन नंबर ब्लॉक कर आणि एकटे राहण्याऐवजी किंवा सर्व प्रकारचे वाईट विचार करण्याऐवजी मन शांत ठेव आणि लोकांमध्ये मिसळ असं सांगितलं. पोलीस आणि तरुणीमधील हे संभाषण चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"